हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा ज्या मतदारसंघाच्या कणाकणात रुजला… तो मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा… कागलचा इतिहास, ऐतिहासिक परंपरा जितकी समृद्ध आहे… तितकच टोकदार इथलं राजकारण देखील…. हसन मुश्रीफ तब्बल २५ वर्षांपासून कागलच्या राजकारणावर आपला दबदबा राखून आहेत… पण समरजीत सिंग घाटगे यांच्या राजकारणातील एंट्रीने कागलची समीकरण बदलली… काहीही झालं तरी कागल मध्ये राजेच! असा एक गट तयार झाला… मुश्रीफांच्या विरोधात घाटगेंनी मागच्या विधानसभेला दोन हात केलीही… पण त्यात मुश्रीफांचं लीड त्यांना काही तोडता आलं नाही… यंदा परिस्थिती वेगळीय… मुश्रीफ आणि घाटगे हे दोन कट्टर विरोधक महायुतीच्या एकाच छताखाली आहेत… काहीही झालं तरी आता आमदारकीचा गुलाल कपाळा लावल्याशिवाय शांत बसणार नाही, असा जणू निश्चय घाटगेंनी केला असला तरी कागलमध्ये यंदाही मुश्रीफ पॅटर्नच चालणार, असं सध्या तरी चित्र दिसतंय…सगळ्या शक्यतांचा विचार केला तरी कागलमध्ये आमदारकीला मुश्रीफच निवडून येतील, असं आम्ही का म्हणतोय? घाटगेंनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावून देखील मुश्रीफांचा अनुभव त्यांना कसा प्लस मध्ये ठेवतोय? कागलमध्ये येणाऱ्या विधानसभेला नेमकं काय घडतय? त्याचंच हे साधं सोपं आणि सविस्तर विश्लेषण…
कार्यकर्ता ते पंचायत समिती सभापती, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री असा 70 वर्षीय मुश्रीफ यांच्या राजकीय प्रवासाची मूळ घट्ट रोवली गेली ती कागल विधानसभेतूनच… 1999 पासून सलग पाच वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते… संजय घाटगे, संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे या राजकारणाचे बाळकडू घरातच घेतलेल्या मातब्बरांना धूळ चारत 1999 पासून सलग पाच टर्म एकाच पक्षाकडून निवडून जाण्याचा रेकॉर्डही मुश्रीफांच्याच नावावर आहे… मुश्रीफ मोठं लीड घेऊन आमदारकी खेचून आणत असले तरी यंदा आमदारकीचा गुलाल कपाळाला लावल्याशिवाय मागे हटणार नाही, असा जणू प्रणच केलेल्या समरजित सिंह घाटगेंनी प्रचाराला देखील सुरुवात केलीय… पण भाजपमध्ये असणाऱ्या घाटगेंनी कागलच्या उमेदवारीसाठी हिंदुत्वापासून अनेक मुद्द्यांच्या आधारावर मुश्रीफांची कोंडी केली… तेच मुश्रीफ अजित दादांसोबत महायुतीत आल्यामुळे घाटगे यांची अस्वस्थता वाढली…
त्यानंतर त्यांचं नॉट रीचेबल असणं… फडणवीसांकडून काढण्यात आलेली समजूत आणि लोकसभेच्या प्रचारात मुश्रीफांसोबत खांद्याला खांद्या लावून काम करण्याची आलेली वेळ यामुळे घाटगे विधानसभेच्या आधीच चांगलेच राजकीय कचाट्यात सापडलेत… मेरिट, सिनिऑरिटी आणि करंट स्टेटस या सगळ्याच पातळ्यांवर महायुतीचा चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांनाच तिकीट मिळणार असल्यामुळे घाटगे यांना पक्षविरोधी भूमिका घेणं, अपक्ष लढणं किंवा विरोधी पक्षात प्रवेश करणं एवढेच पर्याय उपलब्ध आहेत… थोडक्यात निवडणूक जिंकण्याची इच्छाशक्ती असली तरी नाईलाजाने भूमिका बदलायला लागत असल्यानं याचा फटका समरजीत सिंग घाटगेंना बसणार, हे कन्फर्म आहे…. तिसऱ्या बाजूला संजय घाटगे हे पारंपारिक विरोधक महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे… पण मुश्रीफ – संजय घाटगे यांच्यातला स्नेह आणि बदलत्या राजकारणामुळे वाढलेली जवळीकता पाहता ते स्वतः मुश्रीफांना निवडणूक अवघड जाईल, इतपत ताकद लावतील, असं सध्या तरी दिसत नाही…
मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा, विधी व न्याय, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण, कामगार, ग्रामविकास अशा महत्वाच्या खात्यामध्ये उल्लेखनीय काम केलं. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत नेहमीच होत असतो…उदाहरणादाखल मुश्रीफ विधी व न्याय खात्याचे मंत्री असताना त्यांनी सरकारी दवाखान्यात गरजू आणि गरीब रुग्णांना 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केला.. .तसंच हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरrब रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येतात….जिल्हा बँक, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संस्था ही सत्ता केंद्र आणि घरोघरी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी असल्याने मुश्रीफ कागलमध्ये विरोधकांपेक्षा प्लस मध्ये राहतात… त्यात मुश्रीफ यांनी अजितदादा गटासोबत जाणं पसंद केल्यानं मतदारसंघात थोडीफार नाराजी असली तरी त्याचा इम्पॅक्ट विधानसभा निकालात पाहायला मिळेल, असं सध्या तरी म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल…
बाकी मुश्रीफांनाही समरजीतसिंग घाटगेंना हलक्यात घेणं परवडणार नाहीये… फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांसोबत असणार त्यांचं ट्युनिंग… मतदारसंघात केलेली अनेक आंदोलन, घेतलेल्या सभा… भाजप पक्षाची मतदारसंघात ठामपणाने मांडलेली बाजू या सगळ्याचा विचार करता भाजपही घाटगेंवर अन्याय होऊ देणार नाही असं दिसतंय… घाटगेही अगदी कॉन्फिडंटली राजकारण कुठेही फिरलं तरी मीच आमदार होईल असं सांगतायत…. यावरून येणाऱ्या काळात कागल विधानसभेत अनेक टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळू शकतात… पण अद्याप तरी त्याला सुरुवात झालेली नाहीये….बाकी आमदारकीचं घोडे मैदान लांब असलं तरी दोन्ही बाजूंनी आत्तापासूनच प्रचाराला सुरुवात झालीय… महायुतीत नसताना भाजपविरुद्ध रोखठोक भूमिका मांडणारा नेता म्हणूनही मुश्रीफ यांची ओळख होती… फडणवीस, चंद्रकांत पाटील किंवा मोदींच्या विरोधातही मुश्रीफ यांनी कायम आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं… पण आता मुश्रीफच महायुतीत आल्यानं घाटगेंना भाजप त्यांच्याविरोधात कशी ताकद देणार हाही मोठा प्रश्न आहे…
2009 साली मिरज इथं जातीय दंगल झाली होती. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले होते. त्यावेळी मुस्लीम असतानाही मुश्रीफ मोठ्या लिडनं विजयी झाले होते… यावरून कागलकर त्यांच्यावर किती विश्वास ठेवतात, हे आपल्याला दिसून येतं… बाकी सत्ताधारी म्हणजेच भाजपसोबत असल्याने मुश्रीफांना येणाऱ्या निवडणुकीत कितपत लॉस होईल? हे सांगता येत नाही… पण विकासाच्या मेरिटच्या बेसिसवर सध्या तरी मुश्रीफच कागलच्या राजकारणात उजवे ठरतात, एवढं मात्र नक्की…बाकी तुम्हाला काय वाटतं? कागल मध्ये येणाऱ्या विधानसभेला मुश्रीफच आपल्या या विजयाचा सिलसिला असाच कायम ठेवतील? की शब्द दिल्याप्रमाणे समरजीत सिंह घाटगे आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावतील? तुम्हाला काय वाटतं