हसीना शेख यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला लावणारा; नाहिद इस्लाम नक्की कोण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या बांगलादेशची परिस्थिती पाहून संपूर्ण देश आता बांगलादेशकडे नजर लावून बसलेले आहे. या ठिकाणाची परिस्थिती देखील अत्यंत अस्वस्थ झालेली दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीत शेख हसीना यांनी देखील त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यांनी तो देश देखील सोडलेला आहे. बांगलादेशातील शेख हसीना यांना सत्तेवरून उतरवण्यासाठी अनेक खूप प्रयत्न केले गेले. आणि विद्यार्थी नेता नाहीद इस्लाम यांनी हा प्रयत्न खूप जोरदार केला. आणि त्यांच्यामुळेच हसीना शेख यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. स्टुडन्ट अगेन्स डिस्क्रिमिनेशन या विद्यार्थी संघटनेचा तो समन्वयक आहे. आणि त्यांनी येत्या 24 तासात अंतरिम सरकार स्थापन करणार आहे. असे देखील आव्हान सगळ्यांना केलेले आहे.

नाहिद शेख त्या चळवळीचा मुख्य चेहरा आहे. ज्यामुळे शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश देखील सोडावा लागलेला आहे. 20 जुलै रोजी पोलिसांनी नाहीद याला अटक केली आरोप केला जात होता. परंतु पोलिसांनीच हा आरोप फेटाळून लावल्याने कोणाला काहीच करता आलेली नाही.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये नाहीदइस्लामला पोलीस त्यांच्या गाडीत बसून नेत आहेत. बेपत्ता झाल्यानंतर 24 तासानंतरच नाहीद इस्लाम हा पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडला. परंतु तो बेशुद्ध होईपर्यंत त्याला पोलिसांनी मारहाण केली होती. असा देखील दावा यामध्ये करण्यात आलेला होता.

याआधी 19 जुलै रोजी नाहीत इस्लामचे मित्र आसिफ महमूद आणि अबू बकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सहा दिवसांनी त्यांच्या डोळ्यावर एक पट्टी बांधली आणि त्यांना निर्जनस्थळी दुर्गम भागात सोडण्यात आले. आणि त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे उपचार झाल्यानंतर 26 जुलै रोजी त्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आलेले आहे. देशातील सुरक्षिततेसाठी त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. परंतु यावेळी पोलिसांकडून पोलिसांनी त्यांच्याकडून आंदोलन संपवण्याचे आवाहन करणारे व्हिडिओ देखील शेअर केलेले आहेत. ज्यावेळी नाहीद हे पोलीस कोठडीतून बाहेर आले. त्यावेळी त्यांनी हे आंदोलन जास्त तीव्र करण्याचा निर्णय घेतला आणि तशी पावले देखील उचलण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे शेख हसीना यांना त्यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि देश देखील सोडावा लागला.