पुणे प्रतिनिधी | चे गव्हेरा म्हटलं कि रक्त गरम झाल्याशिवाय राहत नाही. अर्नेस्टो चे गव्हेरा या क्युबन क्रांतिकारकाच्या कारकीर्दीवर आणि विचारांवर प्रतिबिंब टाकणाऱ्या क्रिशिव क्रियेशन्स निर्मित, “हॅश अर्नेस्टो टॅग गव्हेरा” या बहुचर्चित नाटकाचा प्रयोग पुण्यात होणार आहे. यंदाच्य पुणे नाट्यसत्ताक मध्ये शुभदिप राहा दिग्दर्शित हॅश अर्नेस्टो टॅग गव्हेरा चा शो दाखवला जाणार आहे.
हे नाटक तुम्ही का पाहायला हवं याची पाच कारणे खालीलप्रमाणे –
१) अमेरिकन क्रांतिकारक चे गव्हेरा याच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. चे ची भूमिका कलाकार गिरीष परदेशी यांनी अतिशय उत्कृष्ठ साकारलेली आहे. प्रथमच एका कलाकृतीच्या सहाय्याने चे गव्हेराची प्रतीकृती भारतीय संदर्भात दाखवण्यात आली आहे.
२) “हॅश अर्नेस्टो टॅग गव्हेरा” च्या टीम मध्ये बहुतांश कलाकार NSD (National School of Drama) चे पासाऊट आहेत. गीता परदेशी आणि गिरीष परदेशी यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे हि कलाकृती निव्वळ आभासी वाटेल आशीच आहे.
३) नाटक सर्व प्रकारच्या विचार्धारांना प्रश्न विचारते. पाहणार्याची राजकीय विचारधारा बदलण्याची या नाटकात ताकद आहे.
४) नाटकचे आत्तापर्यंत देशभर अनेक शो झाले आहेत. सिलीगुरी, कोलकाता, दिल्ली या प्रमुख शहरांननंतर आता पुण्यामध्ये प्रयोग होणार आहे. मुंबईतील प्रसिध्द काला घोडा फेस्टिवल नंतर आता पुणे नात्यासात्तक मध्ये नाटकाचा शो होत आहे.
५) नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितच साक्षात अर्नेस्टो चे गव्हेरा ला भेटल्याचा फील येईल.
नाटकाचे नाव – हॅश अर्नेस्टो टॅग गव्हेरा
लेखक/दिग्दर्शक – शुभदिप राहा
भुमिका – गिरिश परदेशी, गिता गुहा, अमित झा आणि प्रमिती नरके
दिनांक – शनिवार, १९ जानेवारी २०१९
वेळ – सायं. ७ वा
ठिकाण – ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड, हिराबाग चौक, पुणे
तिकीट बुकिंग – Ticketees
“हॅश अर्नेस्टो टॅग गव्हेरा”
Tickets Details: https://t.co/GjHO0MG26W
Seasons Pass: https://t.co/vuRGSYFBLJ
Saturday | 19 January 2019 | 7:00 PM
Jyotsna Bhole Sabhagruha, Tilak Road, Pune#PuneNatyasattak2019 #HashErnestoTagGuevara #punetheatre #hinditheatre. #cheguevara pic.twitter.com/UEj4mCkjYk— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 18, 2019
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero
आणि भगतसिंहांना फाशीची शिक्षा देण्यात आली
इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी