कागलमध्ये हसन मुश्रिफांच निर्विवाद वर्चस्व कायम !!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कागल मतदार संघाचा निकाल जनतेसमोर आला आहे. राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे सलग पाचव्यांदा विजयी झालेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून संजय घाडगे आणि ‘भाजपा’चे बंडखोर उमेदवार समरजितसिंह घाडगे उभे होते. या दोघांचा देखील मुश्रीफांनी दारुण पराभव केला आहे.

या मतदारसंघाकडे ‘हाय होल्टेज’ लढत म्हणून पाहिले जात होते. परंतु मुश्रीफांनी बाजी मारत पुन्हा एकदा आपले स्थान भक्कम केले आहे. दरम्यान या विजयानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवडून दिल्याबद्दल त्यांनी सर्व जनतेचे आभार मानले. तसेच ‘माझ्या चामड्याचे जोडे करून सर्वांना घातले तरी उपकार फिटणार नाहीत’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच ‘मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू आणि जनतेची सेवा करू’ असं मुश्रीफ यांनी यावेळी म्हटलं आहे.

Leave a Comment