Hathras Stampede : सत्संग मैदान बनलं ‘स्मशानभूमी’!!! चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू; जबाबदार कोण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये येथील भोले बाबांचा सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत (Hathras Stampede) आत्तापर्यंत तब्बल ११६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं देशभरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. भोले बाबांच्या सत्संगासाठी अलोट गर्दी झाली होती. पण सत्संग संपल्यानंतर उन्हात बसलेल्या लोकांनी घरी परतण्यासाठी गर्दी केली. परीस्थिती इतकी चिघळली कि लोक एकेकेकांच्या अक्षरशः अंगावरून जाऊ लागले. यूपी पोलिसांनी ‘भोले बाबां’च्या शोधात मैनपुरी जिल्ह्यातील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शोधमोहीम राबवली, मात्र या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाय.

नेमकं काय घडलं ?? Hathras Stampede

सत्संग संपल्यावर गुरुजींची गाडी निघाली. लोक त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावले आणि चेंगराचेंगरी झाली. बाहेर पडण्याचे गेट खूपच अरुंद होता आणि रस्त्यात एक नाला देखील होता. आजूबाजूला चिखल होता. याच दरम्यान, चेंगराचेंगरी (Hathras Stampede) झाली. अनेक जण एकावर एक पडले. तरीही एकमेकांना तुडवत लोक जात होती. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला तर काहीजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मृतदेह, जखमींना ट्रक आणि इतर वाहनांमध्ये भरून सिकंदरौ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं. इतके मृतदेह होते की, शवाघर पूर्ण भरुन गेलं होतं. अखेर रुग्णालयाबाहेरच्या आवारात मृतदेह ठेवण्यात आले. तिथेच नातेवाईकांनी गर्दी केली होती. काही मृतदेहांची ओळख पटली होती, तर काहींची ओळख अजूनही पटलेली नव्हती.

आपल्या जवळच्या माणसांचा आणि नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचे पाहून आप्तेष्ठांचा आक्रोश ऐकू येत होता. सत्संगात इतके भाविक जमले की आयोजक आणि प्रशासनाची व्यवस्था कोलमडली, मग अपघातातील जखमींची संख्या इतकी वाढली की, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पुरेशी वाहनं नव्हती. या एकूण सर्व घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठक बोलावली. तसेच या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही आदित्यनाथ यांनी दिली.