कराड | कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या देशी पिस्टल बाळगणाऱ्या हजारमाची ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय- 31 वर्षे, रा- व्यापारी पेठ, ओगलेवाडी, ता-कराड) असे नांव आहे.
कराड शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड -पाटण रोडवर एकजण पिस्टल घेऊन आल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली होती. त्याबाबत श्री. पाटील यांनी सपोनि अमित बाबर व त्यांचे पथकास कळवून पुढील कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे मिळाले बातमीच्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्यापथकाने छापा कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी हा पोलीसांना पाहून पळून जाण्याच्या बेतात असताना पोलीसांनी त्यास पकडले. त्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी असे सांगितले. त्यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेचे पाठीमागे पॅन्टचे आतील बाजुस पिस्टल 45 हजार रुपये किंमतीची एक सिल्वर रंगाची लोखंडी पिस्टल देशी बनावटीचे मॅगझीन सह पिस्टल मिळून आली. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि अमित बाबर हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित बोऱ्हाडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बी.आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित बाबर सहा. पोलीस निरीक्षक कराड शहर पो. ठाणे, पोउपनि अशोक भापकर सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, संदीप कुंभार, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे.