नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेने त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट्स (RD) चे व्याजदर बदलले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर आपले दर बदलले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे नवे दर कालपासून म्हणजेच 12 जानेवारीपासून लागू झाले आहेत.
आज जाहीर झालेल्या बदलानंतर, HDFC बँक आता 7 ते 29 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर 2.50 टक्के व्याजदर देत आहे. 30 दिवस ते 90 दिवसात मुदतपूर्ती होणाऱ्या डिपॉझिट्सवर आता सर्वसामान्यांना 3.00 टक्के व्याजदर मिळणार आहे. बिगर ज्येष्ठ नागरिकांना आता 91 दिवस – 6 महिने आणि 6 महिने 1 दिवस ते 1 वर्षात फिक्स्ड डिपॉझिट्सवर 3.50 टक्के आणि 4.40 टक्के व्याज मिळेल.
2 कोटींपेक्षा कमी रुपयांवरील व्याजदर
वेळ नियमित व्याज दर (% मध्ये) ज्येष्ठ नागरिक दर (% मध्ये)
7-14दिवस 2.50 % 3.00 %
15-29 दिवस 2.50 % 3.00 %
30-45 दिवस 3.00 % 3.50 %
46-60 दिवस 3.00 % 3.50 %
61-90 दिवस 3.00 % 3.50 %
91 दिवस ते 6 महिने 3.50 % 4.00 %
6 महिने 1 दिवस – 9 महिने 4.40 % 4.90 %
9 महिने 1 दिवस – 1 वर्षापेक्षा कमी 4.40 % 4.90 %
1 वर्ष 4.90 % 5.40 %
1 वर्ष 1 दिवस – 2 वर्षे 5.00 % 5.50 %
2 वर्षे 1 दिवस – 3 वर्षे 5.20 % 5.70 %
3 वर्षे 1 दिवस – 5 वर्षे 5.40 % 5.90 %
5 वर्षे 1 दिवस – 10 वर्षे 5.60 % 6.35 %
HDFC बँक रिकरिंग डिपॉझिट्स व्याज दर
HDFC बँकेतील रिकरिंग डिपॉझिट्सवरील व्याजदरातही आज बदल करण्यात आला आहे. बँक सध्या रहिवासी, NRO आणि NREs यांना 27 महिने ते 120 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या रिकरिंग डिपॉझिट्सवर खालील व्याजदर देत आहे.
वेळ व्याज दर (वार्षिक) ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर अनिवासी भारतीयांसाठी प्रभावी होईल
6 महिने 3.50 % 4.00 % N.A. 25 ऑगस्ट 2020
9 महिने 4.40 % 4.90 % N.A. 25 ऑगस्ट 2020
12 महिने 4.90 % 5.40 % 4.90 % 15 ऑक्टोबर 2020
१५ महिने 5.00 % 5.50 % 5.00 % 1 डिसेंबर 2021
२४ महिने 5.00 % 5.50 % 5.00 % 1 डिसेंबर 2021
27 महिने 5.20 % 5.70 % 5.20 % 12 जानेवारी 2022
26 महिने 5.20 % 5.70 % 5.20 % 12 जानेवारी 2022
३९ महिने 5.40 % 5.90 % 5.40 % 12 जानेवारी 2022
48 महिने 5.40 % 5.90 % 5.40 % 12 जानेवारी 2022
60 महिने 5.40 % 5.90 % 5.40 % 12 जानेवारी 2022
90 महिने 5.60 % 6.10 % 5.60 % 12 जानेवारी 2022
120 महिने 5.60 % 6.10 % 5.60 % 12 जानेवारी 2022