हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank ने 20 एप्रिल म्हणजेच आजपासून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज दरात बदल केले आहेत. खासगी क्षेत्रातील या सर्वांत मोठ्या बँकेने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज दर बदलेले आहेत. अलीकडेच, देशातील इतर काही बँकांनी देखील आपल्या FD वरील व्याजदरात बदल केले आहेत.
HDFC Bank चे फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज दर खालीलप्रमाणे असतील
7 दिवस ते 29 दिवस 2.50 टक्के
30 दिवस ते 90 दिवस 3 टक्के
91 दिवस ते 6 महिने 3.50 टक्के
6 महिने एक दिवस ते 9 महीने 4.40 टक्के
9 महीने 9 दिवस ते एक वर्ष 4.40 टक्के
एक वर्ष एक दिवस ते दोन वर्ष 5.10 टक्के
दोन वर्ष एक दिवस ते तीन वर्ष 5.20 टक्के
तीन वर्ष एक दिवस ते पाच वर्ष 5.45 टक्के
पाच वर्ष एक दिवस ते 10 वर्ष 5.60 टक्के
टीप : हे व्याज दर वार्षिकरित्या उपलब्ध असतील.