Wednesday, June 7, 2023

होळीसाठी HDFC Bank कडून आनंदाची बातमी, आता ‘या’ ग्राहकांना 30 जूनपर्यंत मिळेल 0.75 टक्के अधिक व्याज

नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने ज्येष्ठ नागरिकांना एक चांगली बातमी दिली आहे. बँकेने पुन्हा एकदा स्पेशल एफडी (special fixed deposit scheme) योजनेची तारीख वाढविली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी (senior citizens) बँक स्पेशल एफडी योजनेची (special FDs) सुविधा देते आहे. या योजनेत बँका ज्येष्ठ नागरिकांना जास्त दराने व्याज देतात. बँकेने ही सुविधा 18 मे 2020 रोजी कोरोना साथीच्या वेळी सुरू केली होती, आता ती 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे, म्हणजे ग्राहकांना 30 जून पर्यंत वाढलेल्या व्याजाचा लाभ मिळेल.

एचडीएफसी बँक या ठेवींवर 75 बेसिस पॉईंट अधिक व्याज देते. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने पैसे जमा केल्यास एफडीला लागू असलेला व्याज दर 6.25 टक्के असेल. हे दर 13 नोव्हेंबर 2020 पासून लागू आहेत.

30 पर्यंत तुम्हाला लाभ मिळेल
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, 18 मे ते 30 जून या कालावधीत स्पेशल एफडीच्या ऑफर दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के (सध्याच्या 0.50 टक्के प्रिमियमपेक्षा जास्त) अतिरिक्त प्रीमियम देण्यात येईल. याअंतर्गत फिक्स्ड डिपॉझिट एका दिवसापासून 10 वर्षांपर्यंत 5 कोटीपेक्षा कमी आणि 5 वर्षांची असणे आवश्यक आहे.

एफडीवर किती व्याज मिळते?
एचडीएफसी बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या ठेवींवर 2.50% व्याज आणि 30-90 दिवसांच्या मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिटसवर 3% व्याज देते. या व्यतिरिक्त 91 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज दिले जाते आणि 6 महिने 1 दिवसापासून ते एका वर्षाच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दिले जाते.

एफडी मॅच्युरिटीवर एका वर्षात बँक 9.9 टक्के व्याज देते. एका वर्षात आणि दोन वर्षांच्या कालावधीत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिटसना 4.9 टक्के व्याज मिळते. 2 वर्ष ते 3 वर्षाच्या मॅच्युर होणाऱ्या एफडीला 5.15 टक्के, 3 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत 5.30 टक्के व्याज मिळते. मॅच्युरिटी कालावधी 5 ते 10 वर्षे मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिटसवर 5.50 टक्के व्याज मिळेल. हे दर 13 नोव्हेंबरपासून लागू आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group