HDFC Bank | दिवाळीआधी HDFC बँकेच्या ग्राहकांना धक्का; बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HDFC Bank | आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही नेहमीच बँकेबद्दलच्या अनेक नियम बदलत असते. तसेच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. अशातच आता रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली 7 ऑक्टोबरपासून एक आजपासून एक बैठक चालू झालेली असून, ही बैठक 9 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यामुळे चलन विषयक धोरण समितीच्या निर्णयाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. अमेरिकन पेट्रोल रिझल्ट व्याजदरात कपात केली आहे. आणि त्यानंतर भारतातही रेपो दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता आरबीआय कडून दिलासा मिळण्याआधी एचडीएफसी बँकेने त्यांच्या कर्ज दारात वाढ करण्यात किंवा निर्णय घेतलेला आहे.

एचडीएफसी (HDFC Bank )बँकेने त्यांच्या कर्जाचे दर 5 बेस पॉइंट पर्यंत वाढवलेले आहेत. त्यामुळे आता एचडीएफसी बँकेचे MCLR व्याजदर आता 9.10 ते 9.45 टक्के एवढे झालेले आहे. हे दर 7 ऑक्टोबर पासूनच लागू झालेले आहेत. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकेने आता त्यांच्या सहा महिन्यांनी तीन वर्षाच्या कालावधीचा कर्जासाठी देखील व्याजदर वाढवलेले आहेत. हे व्याजदर पाच BPSअसणे वाढवलेले आहेत.

तसेच इतर मुदतीच्या कर्जावरील व्याजदर कायम राहणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. हा व्याजदर आता 9.10 आणि एका महिन्यासाठी 9.15 टक्के झालेला आहे तसेच तीन महिन्याच्या कालावधीसाठी MCLR हा 9.40 टक्क्यांवर 9.45 टक्के करण्यात आलेला आहे. त्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हा MCLR 9.30% करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 9.45% आहे तर दोन वर्षासाठी हा MCLR 9.40% होता तो आता 9.45% करण्यात आलेला आहे तर तीन वर्षाच्या कालावधीसाठी हा MCLR 9.50% करण्यात आलेला आहे.

MCLR म्हणजे काय ? | HDFC Bank

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट हा एक किमान व्याजदर आहे. ज्यावर कोणतीही वित्तीय संस्था किंवा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देते. हा भारतीय रिझर्व बँकेने सेट केलेला एक बेंच मार्क आहे. जो बँकांना गृह कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज घेण्यास ठरवण्यासाठी मदत करतो.