हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : RBI कडून गेल्या महिन्यात रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांनी व्याजदर वाढवल्याने कर्ज महागले. आता या लिस्टमध्ये आणखी एका मोठ्या बँकेचे नाव जोडले गेले आहे. HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. यावेळी बँकेने विविध कालावधीसाठीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 20 बेस पॉइंट्स किंवा 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. ज्यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. 7 जुलै 2022 पासून बँकेचे हे नवीन दर लागू झाले आहेत.
HDFC Bank च्या वेबसाइटनुसार, एक रात्र कालावधीच्या MCLR च्या दरात 20 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. त्यानंतर तो 7.70 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, एक महिन्याच्या कालावधीसाठीचा MCLR दर 7.75 टक्के, 3 महिन्यांच्या कालावधीसाठीचा MCLR 7.80 टक्के आणि 6 महिन्यांच्या कालावधीसाठीचा MCLR 7.90 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, एक वर्षाचा MCLR 8.05 टक्के करण्यात आला आहे.
हे लक्षात घ्या की, बँकेकडून गेल्याच महिन्यात MCLR मध्ये 35 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली होती. 7 जूनपासून हे नवे
दर लागू करण्यात आले आहेत.
EMI मध्ये देखील होईल वाढ
MCLR मध्ये वाढ झाल्याने टर्म लोनवरील EMI मध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. इथे हे लक्षात घ्या कि, बहुतांश ग्राहक कर्जे ही MCRL वर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन महागू शकते.
MCLR म्हणजे काय ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्याच्या आधारावर बँकाकडून कर्जासाठीचा व्याजदर ठरवला जातो. 1 एप्रिल 2016 पासून RBI ने देशात MCLR सुरू केला. त्यापूर्वी सर्व बँकाकडून बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित केला जात असे. एप्रिल 2016 पासून बँका बेस रेटच्या जागी MCLR वापरत आहेत. आता MCLR मध्ये कोणतीही वाढ किंवा कपात झाल्यास त्याचा परिणाम नवीन आणि सध्याच्या कर्जदारांवर होतो. HDFC Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/borrow/popular-loans/personal-loan/interest-rates-and-charges
हे पण वाचा :
PPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने केले ‘हे’ मोठे बदल
Aadhar Card चे व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे का आहे ??? समजून घ्या
TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत
Share Market मध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे हे समजून घ्या
Investment : फक्त 1000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या