हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Bank) जर तुमचे अकाउंट HDFC बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आजकाल जो तो UPI पेमेंट ऍपचा वापर करताना दिसतोय. पण जर तुम्ही HDFC खाते धारक असाल तर मात्र तुम्हाला UPI पेमेंट सुविधेतील एक विशेष लाभ घेता येणार नाहीये. लवकरच HDFC बँक UPI पेमेंट ऍप वापरकर्त्यांची एक सुविधा बंद करणार आहे. ज्यामुळे बँकेच्या सर्व ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मॅसेज आणि ई- मेलच्या माध्यमातून माहिती दिली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
SMS सेवा होणार बंद (HDFC Bank)
HDFC बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार, अल्प रकमेच्या UPI व्यवहारांसाठी आता SMS अलर्ट पाठवले जाणार नाही. अर्थात, जर तुम्ही HDFC खातेधारक असाल आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी UPI पेमेंट ऍपच्या मदतीने १०० रुपयांपेक्षा कमी रकमेचा व्यवहार केल्यास त्याचा तुम्हाला SMS अलर्ट येणार नाही. आतापर्यंत ही बँक प्रत्येक लहान रकमेच्या व्यवहारासाठी तुम्हाला SMS पाठवत होती. मात्र आता कोणत्याही लहान वा छोट्या व्यवहारांसाठी ही बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे SMS पाठवणार नाही. मात्र, तुम्ही १०० रुपये वा त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केलात तर आणि ५०० रुपयांपेक्षा जास्त रुपये रिसिव्ह केलात तर तुम्हाला बँकेकडून SMS मिळत राहतील.
तसेच HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी देखील अशीच सुविधा असेल. एखाद्या ग्राहकाने ५०० रुपयांपर्यंत क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार केले तर त्याबाबत कोणताही मॅसेज पाठवला जाणार नाही. (HDFC Bank) तथापि, UPI किंवा क्रेडिट कार्डद्वारे सर्व प्रकारच्या पेमेंटवर ई- मेल अधिसूचनेची सुविधा मात्र सुरु ठेवली जाणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ही SMS अलर्टची सुविधा येत्या २५ जून २०२४ पासून बंद होणार आहे. याबाबत बँकेने मॅसेज तसेच ई – मेल पाठवून ग्राहकांना माहिती दिली आहे.
आपल्या देशात डिजिटल पेमेंट ऍपच्या दुनियेत Paytm, PhonePe आणि GooglePay हे सर्वाधिक लोकप्रिय आणि वापरले जाणारे ऍप आहेत. हे ॲप्स आजकाल UPI Lite चा प्रचार करत आहेत. ज्याच्या मदतीने, ५०० रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी कोणताही पासवर्ड वा पिनची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे बँकेलाही मॅसेज सुविधेचा वापर केल्याने खर्च करावा लागत नाही. मात्र, गेल्या काही काळात UPI वापरून छोट्या व्यवहारांची संख्या प्रचंड वाढली आहे. (HDFC Bank) अगदी ५ ते १० रुपयांसाठी देखील UPI ऍपचा वापर केला जात आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मते, गेल्या वर्षी UPI व्यवहारांची संख्या वर्षाच्या अखेरीस ११८ अब्जांवर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काळात ही बाब आणखी गंभीर ठरू शकते.