HDFC Bank महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यात करेल मदत ! विशेष स्टार्टअप अपग्रेड प्रोग्रॅम केला लॉन्‍च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने ‘स्‍मार्ट-अप उन्‍नति’ (SmatUp Unnati) हा मार्गदर्शक कार्यक्रम लॉन्‍च केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ महिला अधिकारी महिला उद्योजकांना वर्षभर सल्लामसलत करून त्यांचे व्यवसाय लक्ष्ये साध्य करण्यास मदत करतील. हा कार्यक्रम केवळ विद्यमान महिला ग्राहकांसाठीच असेल असे बँकेने स्पष्ट केले आहे.

‘महिला उद्योजकांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल’
स्मार्टअप अपग्रेडेशन प्रोग्रॅमचा एक भाग म्हणून, एचडीएफसी स्मार्टअप प्रोग्रॅमशी संबंधित 3,000 हून अधिक महिला उद्योजकांना सल्लामसलत प्रदान करेल. एचडीएफसी बँकेच्या शासकीय आणि संस्थात्मक व्यवसाय, ई-कॉमर्स आणि स्टार्टअप बँकिंगच्या देशप्रमुख स्मिता भगत म्हणाल्या की, “महिलांना समान संधी उपलब्ध करुन देण्यात आमचा विश्वास आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी आम्ही बर्‍याच वर्षांपासून सातत्याने काम करत आहोत.” त्या म्हणाल्या की,”महिला उद्योजकांना स्टार्टअप सुरू करून यशस्वी करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.”

‘महिला उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यात बरीच मदत मिळेल’
स्मिता भगत म्हणाल्या की,”एचडीएफसी बँकेच्या स्मार्टअप अपग्रेडेशन प्रोग्रॅमअंतर्गत आमच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अनुभवातून महिला उद्योजकांना निश्चितच मोठा फायदा होईल. यामुळे त्यांचा दृष्टीकोन वाढेल आणि योग्य वेळी चांगल्या सल्ल्याद्वारे त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत होईल. 2018 मध्ये एचडीएफसी बँकेने आपल्या स्मार्टअप प्रोग्रॅम अंतर्गत बँकिंग स्टार्टअपसाठी एक ऑनलाइन मार्गदर्शक प्लॅटफॉर्म सुरू केला. त्याअंतर्गत बँक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्य सरकारांशी एकत्र काम करीत आहे. त्या म्हणाल्या की,” हा कार्यक्रम संपूर्णपणे महिला आणि महिलांसाठीच आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment