नवी दिल्ली । दुसऱ्या तिमाहीत HDFC बँकेचा निव्वळ नफा 18% वाढून 8,834 कोटी रुपये झाला. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत एचडीएफसी बँकेचा निव्वळ नफा 7,513 कोटी रुपये होता. एचडीएफसी बँकेचे निव्वळ उत्पन्न 14.7% वाढून 25,085.2 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत ती 21,868.8 कोटी रुपये होती.
बँकेने दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले निकाल दाखविले. बँकेचा NII 12% आणि नफा सुमारे 18% वाढला. NPA मध्ये घट झाली आहे.व्यवस्थापनाने सांगितले की “ग्रामीण आणि एसएमई मध्ये आणखी मजबूत वाढ दिसून येते.”
HDFC बँकेबाबत ब्रोकरेज
एचडीएफसी बँकेबाबत ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, बँकेचा दुसरा तिमाही कमी स्लिपेजसह अपेक्षेपेक्षा चांगला झाला आहे. रिटेल लोन सेगमेंट मधील वाढ सुधारली आहे. यामध्ये अंदाजापेक्षा 1.2 टक्के जास्त रिस्ट्रक्चरिंग दिसले. त्याचबरोबर बँकेचे रिटेल लोन आणखी वाढेल अशी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.
HDFC बँकेबद्दल MORGAN STANLEYचे मत
MORGAN STANLEY चे एचडीएफसी बँकेवर ओव्हरवेईट रेटिंग दिले आहे आणि शेअरचे टार्गेट 2050 रुपये केले आहे.
HDFC बँकेबाबत CLSA चे मत
CLSA ने एचडीएफसी बँकेबाबत खरेदीचे रेटिंग दिले आहे आणि शेअरचे टार्गेट 2025 रुपये केले आहे.
HDFC बँकेबाबत NOMURA चे मत
NOMURA ने HDFC बँकेबाबत खरेदीचे रेटिंग दिले आहे आणि शेअरचे टार्गेट 1955 पर्यंत वाढवले आहे.
HDFC बँकेबाबत CREDIT SUISSE चे मत
CREDIT SUISSE ने एचडीएफसी बँकेबाबत उत्कृष्ट कामगिरी रेट केली आणि स्टॉकचे टार्गेट 1950 रुपये केले.
बँकेचा NPA देखील कमी झाला
जून 2021 च्या तिमाहीत 1.4 टक्क्यांच्या तुलनेत 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत (सप्टेंबर तिमाही) बँकेची एकूण नॉन-परफॉर्मिंग असेट्स (NPA) 1.35 टक्क्यांवर घसरली. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेचा NPA 1.37%होता. एचडीएफसी बँकेने सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 1451 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर हे 17,756 कोटी रुपये आपत्कालीन खर्चासाठी ठेवण्यात आले होते.
डिसेंबर 2020 मध्ये RBI ने HDFC बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती. एचडीएफसी बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील तांत्रिक अडचणींमुळे मध्यवर्ती बँकेने नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती. मात्र, ऑगस्टमध्ये त्याने ही बंदी उठवली. त्यानंतर, सप्टेंबरच्या अखेरीस, त्याने 4 लाख नवीन क्रेडिट कार्ड जारी केले होते. बंदीमुळे बँकेच्या कार्ड बाजाराचा मोठा भाग प्रतिस्पर्धी बँकांकडे गेला होता.