HDFC MCLR Rate Hike : HDFC बँकेच्या ग्राहकांना धक्का!! गृहकर्ज, कार लोन महागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची बँक असलेल्या HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या किरकोळ कर्ज-आधारित व्याज दरांमध्ये (MCLR) वाढ (HDFC MCLR Rate Hike) केली आहे. हि वाढ 5 बेस पॉईंटने झाली असली तरी बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कारण MCLR दरात वाढ झाल्याने ग्राहकांचे कार लोन, गृहकर्ज आणि महिन्याचा EMI आपोआपच वाढणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या या काळातच ग्राहकांना आर्थिक झळ बसणार आहे.

MCLR रेट 5 बेस पॉईंटने वाढव- HDFC MCLR Rate Hike

HDFC बँकेने फक्त 3 महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR रेट 5 बेस पॉईंटने वाढवला आहे. इतर सर्व कालावधीसाठी हा दर समान राहील. तीन महिन्यांचा MCLR दर आता 9.25 टक्क्यांवरून 9.30 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा MCLR रेट 9.40 टक्के आहे. सर्व दीर्घ कालावधीसाठी, MCLR रेट 9.45 टक्के आहे, HDFC बँकेने आपल्या अधिकृत वेबसाईट वर याबाबतची माहिती दिली आहे. MCLR रेट हा बँकांना विविध प्रकारच्या कर्जांसाठी म्हणजेच उदारहर्णार्थ गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, कार लोन वर त्यांचे व्याजदर निश्चित करण्यात मदत करतो. त्यामुळे MCLR रेट वाढला (HDFC MCLR Rate Hike) कि हि सर्व कर्जेही वाढतात.

MCLR म्हणजे काय?

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट. सोप्या भाषेत सांगायचं तर निधी आधारित कर्ज दराची सीमांत किंमत. MCLR हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. यामध्ये निधीची किंमत, ऑपरेटिंग खर्च, CRR (कॅश रिझर्व्ह रेशो) वर शून्य परतावा, प्रीमियम या घटकांचा समावेश आहे. 2016 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मूळ दर प्रणालीची जागा MCLR आधारित कर्जदरांनी घेतली. परंतु ज्या कर्जदारांनी 2016 पूर्वी कर्ज घेतले होते ते अजूनही मूळ दर किंवा बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) द्वारे शासित आहेत. MCLR रेट वाढल्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला आपल्या कर्जावर अधिक व्याज भरावे लागणार आहे. परिणामी ग्राहकांचा EMI सुद्धा वाढतो, आणि बँकेला मात्र याचा फायदा होताना दिसतो .