HDFC Mutual Fund | केवळ 5 हजारांची SIP करून; तुमच्या मुलांसाठी जमा करा करोडोंचा फंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HDFC Mutual Fund | आजकाल लोकांमध्ये गुंतवणुकीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. तुम्ही जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला चांगलं फायदा मिळतो. बाजारामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. परंतु अनेक लोक असे आहेत, जेम्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या एसआयपीचे पर्याय मिळतात. तुम्ही लहान मुलांसाठी देखील एसआयपी करू शकता. जेणेकरून मोठे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी तुम्हाला चांगला फंड जमा करता येईल.

तुम्हाला जर तुमच्या मुलाला चांगली लाईफस्टाईल द्यायची असेल, तर लहान असल्यापासूनच तुम्हाला त्याच्या नावाने एसआयपी चालू करावी लागेल. तुम्ही लवकरात लवकर पैसे गुंतवले, तर त्याचा शिक्षण तसेच इतर सगळ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा तुम्ही जमा करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चिल्ड्रन फंड योजना बद्दल सांगणार आहोत.

चिल्ड्रन फंड योजनेचे विविध फायदे | HDFC Mutual Fund

  • चिल्ड्रन फंड गुंतवणुकीमध्ये तुम्हाला टॅक्स सूटचा अनुभव घेता येतो.
  • तुम्ही चिल्ड्रन फंड मध्ये पैसे गुंतवले तर सेक्शन 80 सी अंतर्गत तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो.
  • चिल्ड्रन फंड योजना ही पाच वर्षाच्या लॉक इन पीरियड सोबत येते.
  • या योजनेचा काही भाग तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये देखील लावू शकता.

एचडीएफसी चिल्ड्रन फंडने मागील दहा वर्षात गुंतवणूकदारांना 14.56% चा परतावा मिळवून दिलेला आहे. त्यामुळे अनेक लोकांनी या योजनेमध्ये पैसे गुंतवलेले आहेत. ही योजना स्टॉक मार्केटमध्ये बॉण्ड्स सोबत देखील कार्यरत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी लहान असतानाच या चिल्ड्रन फंड योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.