Tuesday, June 6, 2023

घरात घुसून ४५ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

औरंगाबाद : शहरात अनेक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच शहरात मंगळसूत्र चोरीच्या घटना ही जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. मुकुंदवाडी भागात राहणारी महिला व तिचा मुलगा तिच्या मामाचे निधन झाल्यामुळे अंतविधीसाठी कडा-आष्टी बीड येथे गेल्या होत्या.

ही संधी साधून चोरट्याने १३ जून रोजी १० ते १२ वाजेच्या दरम्यान घरातून ४५ हजार रुपयांचे १५ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र चोरट्यानी चोरून नेले. यापूर्वी ही अनेक मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत, परंतु या घटनेत महिलेच्या घरातून मंगळसूत्र चोरीला गेले आहे.

याघटने प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शंकर अंबादास गोंड याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या संबंधी पुढील तपास सुरू आहे.