आईवडिलांनी मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्यामुळे तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने शुल्लक कारणावरून आत्महत्या (suicide) करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अक्षय खेताडे असे या आत्महत्या (suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फक्त आईवडिलांनी नवीन मोबाईल घेऊन न दिल्यामुळे या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत अक्षय खेताडे हा 23 वर्षीय तरुण आई वडिलांकडे पैसे मागत होता. मुलाला मद्याची नशा करण्याची सवय असल्याचे पाहून आई-वडील पैसे देत नव्हते. त्याचाच राग अक्षय खेताडे या 23 वर्षीय तरुणाला आल्याने त्याने आत्महत्या (suicide) केली. त्याने आई-वडील घरात झोपल्याचे लक्षात येताच त्याने बाहेरून घराचा दरवाजा लावला आणि पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.

नाशिकच्या सातपुर पोलीस ठाण्यात अक्षय खेताडे याच्या मृत्यूची (suicide) आकस्मित नोंद करण्यात आली आहे. सातपुरच्या अशोकनगर परिसरात ही घटना घडल्याने संपूर्ण सातपुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सातपुर पोलीसांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या