महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. महत्वाचा पक्ष असलेल्या महायुती सरकार मधील भाजप पक्षाने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीच्या जागेवर स्वत: अजित पवार लढणार असल्याचे या यादीमधून स्पष्ट झाले आहे. शिवाय इतरही महत्वाच्या जागेंवर देखील राष्ट्रवादी कडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून जिंकत आलेल्या राष्ट्रवादी बळकट जागांवर अजित पवार यांनी उमेदवार दिले आहेत. जसे बारामती मतदार संघातून स्वत: अजित पवार लढणार आहेत. कागल मधून हसन मुश्रीफ , हडपसर मधून चेतन तुपे, येवला मतदार संघातून छगन भुजबळ यांना उमेदवार घोषित करण्यात आले आहे. आता राज्यातील राजकीय समीकरणे बबदलल्यामुळे यंदाच्या वेळची लढत रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार गटाची संपूर्ण यादी
- बारामती- अजित पवार
- येवला- छगन भुजबळ
- कागल- हसनमु शरीफ
- परळी- धनंजय मुंडे
- दिंडोरी- नरहरी झिरवाळ
- कळमनेर- अनिल पाटील
- तुमसर- राजू कारेमोरे
- अहेरी- धर्मराव बाबा आत्राम
- पुसद- इंद्रनील नाईक
- वसमत- चंद्रकांत नवघरे
- कळवण- नितीन पवार
- सिन्नर- माणिकराव कोकाटे
- निफाड- दिलीप बनकर
- देवळाली- सरोज अहिरे
- शहापूर- दौलत दरोडा
- श्रीवर्धन- आदिती तटकरे
- उदगीर- संजय बनसोडे
- जुन्नर- अतुल बेनके
- आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
- आळंदी खेड- दिलीप मोहिते
- इंदापूर- दत्तात्रय भरणे
- मोहोळ- यशवंत माने
- मावळ-सुनील शेळके
- चिपळूण- शेखर निकम
- पिंपरी- अण्णा बनसोडे
- वडगाव शेरी- सुनील टिंगरे
- चंदगड- राजेश पाटील
- हडपसर- चेतन तुपे
- अकोले- किरण लहामटे
- करमाळा- संजय शिंदे
- मोर्शी -देवेंद्र भुयार
- कोपरगाव- आशुतोष काळे
- अहमदनगर शहर- संग्राम जगताप
- माजलगाव- प्रकाश सोळंके
- अहमदपूर- बाबासाहेब पाटील
- अनुषक्ती नगर- सना मलिक
- शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक
- अमरावती शहर- सुलभा खोडके
- इगतपुरी-हिरामण खोसकर