Wednesday, February 8, 2023

धक्कादायक ! प्रेयसीच्या त्रासामुळे त्याने केली पाच जणांची हत्या

- Advertisement -

देवास : वृत्तसंस्था – देवास जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पाच जणांची हत्या करून मृतदेह खोल खड्ड्यात पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र चौहान याने आपल्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळुन मित्रांच्या मदतीने पाच जणांची हत्या केली आहे.

देवास जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या नेमावरमधील एका शेतात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी जमीन खोदून पाच मृतदेह बाहेर काढले. हे पाचही जण १३ मे पासून बेपत्ता होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये एक महिला, तीन युवती आणि एका युवकाचा समावेश होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता या हत्याकांडाशी संबंधित पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरेंद्र चौहानच्या शेतात खड्ड्यात पुरलेले पाचही मृतदेह ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने जवळपास दहा फूट खोदकाम करून मृतदेह ताब्यात घेतले. या शेताचा मालक सुरेंद्र चौहान याचे एका युवतीशी प्रेम प्रकरण सुरू होते व त्यातून हे भीषण हत्याकांड करण्यात आले होते.

- Advertisement -

साथीदारांची घेतली मदत
मिळालेले मृतदेह ममता मोहनलाल कास्ते,रूपाली मोहनलाल,दिव्या मोहनलाल,पूजा रवी ओसवाल,पवन रवि ओसवाल यांचे आहेत. पोलिसांनी या ६ आरोपींची चौकशी केली असता मुख्य आरोपी सुरेंद्र याने त्याच्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आपल्या मित्रांच्या मदतीने संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचे मान्य केले.