धक्कादाक ! मोबाईलसाठी भावानेच विहिरीत ढकलून केली भावाची हत्या

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील काही दिवसांमध्ये शहर व परिसरात खूनाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आता तर मोबाईलसाठी मामा भावाने आत्या भावाचा विहिरीत ढकलून आणि नंतर डोक्यात दगड घालून खून केल्याची मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. आजोबांनी आपल्या आत्या भावाला दिलेला मोबाईल आपल्याला मिळावा म्हणून 17 वर्षीय भावाने हे कृत्य केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण एमआयडिसी पोलीस ठाणे हद्दीत 3 डिसेंबर रोजी ढोरकिन-बालानगर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता या प्रकरणी वाळूज पोलीस स्टेशनला 2 डिसेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मयताची ओळख पटवली असता वाळूजजवळ असलेल्या शेंदूरवादा गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं.मयत तरुण आणि आरोपी दोन्ही आत्या-मामा भाऊ असून दोघेही 17 वर्षांचे आहेत. तर मयत तरुणाला त्याच्या आजोबांनी मोबाईल घेऊन दिला होता आणि तोच मोबाईल आरोपी अल्पवयीन मुलाला हवा होता.

त्यासाठी त्याने कट रचला आणि आत्या भावाला बिर्याणी आणि दारू पाजतो म्हणून पैठण तालुक्यातील बिडकीन गावात घेऊन गेला. तिथे बिर्याणी आणि दारू घेतनंतर बालानगर रोडवर असलेल्या एका विहिरीवर थांबून बिर्याणी खाल्ली. याचवेळी आरोपीने तुझे फोटो काढतो म्हणून आत्या भावाला विहिरीच्या काठावर उभं केलं आणि ढकलून दिले. मोबाइलच्या लोकेशनवरून सीडीआर काढण्यात आलं आणि तिथून पोलिसांना या गुन्ह्याची उकल झाली. चौकशीअंती घटनेतील मामेभावानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून भावाला मोबाइल मिळाल्याच्या रागातूनच हे कृत्य केल्याचं उघड झाले आहे.