औरंगाबाद | पतीचा खून करण्यासाठी बहिनीला सोबत घेऊन ओळखीच्या लोकांना दोन लाख रुपये सुपारी देत खून केल्याची घटना काल सायंकाळी ७ वाजता पैठण तालुक्यातील पचोड हद्दीतील देवगाव तेथे समोर आली. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शिवारात मिळाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाहणी करून मयताची ओळख पटवली. पोलिसांना हा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत मिळाला.
अशोक बाबासाहेब जाधव वय (५०) रा. कठेठाण बु. ता. पैठण असे मृताचे नाव आहे. पत्नी रंजना अशोक जाधव वय (३६) हिचे तिचा चुलत दीर रामप्रसाद शिवाजी जाधव याच्यासोबत अनैतिक संबंध होते. घटनेच्या काही दिवसापूर्वी पत्नी रंजना व प्रियकर रामप्रसाद यांचे मोबाईल वरील संवाद पतीने ऐकला होता आणि त्यांचा वाद झाला. भविष्यात या अनैतिक संबंधास पती अडसर ठरेल या कारणाने बहीण मिनाबाई पठाडे हिला काहीही फोन करुन नवऱ्याची सुपारी देण्यासाठी मी तुला दागिने व शेती विकून पैसे देण्याची कबुली दिली. त्यानंतर मिनाबाईने तिच्या ओळखीच्या संतोष पवार याला खून करण्यासाठी सुपारी दिली. त्याला २ लाख देण्याचे ठरवले त्यातील १७००० रूपये रोख रक्कम दिली.
त्यानंतर तिघांनी आपआपसात खून खून कसा करायचा हे ठरवले.
१९ तारखेला मिनाबाई यांनी मेव्हणा अशोक याला करंजगावला भेटायला बोलवले. त्यानंतर सोमठाणा येथील रेणुकादेवी मंदिराच्या डोंगरावर घेऊन गेली. तिथे संतोष पवारसह आणखी तीन जण उपस्थित होते. या सर्वांनी मिळून लाथा बुक्क्यासह हात पाय बांधून गळा दाबून अशोक यांचा खून केला व मृतदेह कार मध्ये टाकून थापटी तांड्या च्या रस्त्यावर फेकून दिला.पोलीसांनी मिनाबाई तिला विश्वासात घेऊन विचारला असता तिने ही सर्व माहिती दिली. यानंतर आरोपीनेही खून केल्याची कबुली पोलीसांना दिली.
या प्रकरणी मुलगा ज्ञानेश्वर अशोक जाधव याने तक्रार नोंदवली होती.त्यानुसार गुन्हे शाखेकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरिक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके सह त्यांची टीम करत आहेत.