कराडचा पारा ४१ अंशावर ; उन्हाने लोक बेहाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

सध्या उन्हाचे चटके जीवघेणे बनले आहेत. कराडमध्ये पारा 41 अंशांवर पोहोचला आहे सातत्याने तापमानात वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाचा चटका सोसवेनासा झाला आहे.

उन्हाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळी तर रस्त्यावर सन्‍नाटा पसरत आहे. पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांची उलघाल होत आहे. आभाळ भरून येत असले तरी ते बरसत नसल्याने उकाड्यात आणखी वाढच होत आहे. दरम्यान, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्‍वरचा पाराही 33 अंशांवर गेला आहे.

पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ

सातार्‍यात तापमानाचा पारा कमाल 41 डिग्री, किमान 26 तर थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वरचे तापमान कमाल 33.04 व किमान 22.04 असल्याची नोंद झाली. गेल्या तीन-चार वर्षांत सातार्‍याचा पारा चढताच राहिला आहे

दुपारच्या वेळेत उन्हाचा प्रचंड चटका बसत आहे. पारा दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या महागाईने व दुष्काळी परिस्थितीमुळे अर्धमेल्या झालेल्या बाजारपेठेवर परिणाम जाणवत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे उन्हाळा नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी

यंदाचा उन्हाळा कडक असणार अशी भाकिते अनेकांनी केली आहेत. ते आता सत्यातउतरत असून उन्हाच्या झळा नागरिकांना सळो की पळो करून सोडत आहेत. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अनेकजण भर उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. यानिमित्ताने होणारी किरकोळ खरेदी थांबल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. बहुतेक दुकानदारांचा दुपारचेवेळी आपली दुकाने बंद ठेवून विश्र्रांती घेण्याकडे कल आहे. उन्हाच्या झळा सोसत शेतात काम करणारे शेतमजूर विविध ठिकाणी काम करणारे कामगार यांचा जीव मेटाकुटीस येत असून पोटाला पर्याय नसल्याने या परिस्थितीत काम करणे त्यांना भाग पडत असल्याचे दिसून येत आहे.

राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला

बहुतांश नागरिक दुपारच्या वेळी घरातच फॅनच्या वार्‍याखाली राहणे पसंत करत आहेत. जे दुपारी बाहेर पडत आहेत ते उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी डोक्याला टोपी, डोळ्याला गॉगल तर महिलांच्या हातात पावसाळ्यात नेहमी दिसणारी छत्री आता उन्हाळ्यातही डोक्यावर दिसत आहे. कडक उन्हापासून बचावासाठी प्रामुख्याने डोक्याला टोपी, डोळ्याला गॉगल घालून नागरिक बाहेर पडत असून उन्हाळी कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. रस्त्यावरील ज्युस, फळांच्या स्टॉलसह बर्फावरील थंडगार कलिंगड खाण्याकडे कल वाढला आहे. शहर व परिसरात असणार्‍या उद्यानात दुपारच्या सत्रात नागरिक वामकुक्षी घेताना दिसत आहेत. बसस्टॉप, रिक्षा थांबे येथेही प्रवासी वर्ग सावलीचा अडोसा घेताना दिसत आहे. झाडांची, वाहनांची तसेच मिळेल ती सावली शोधून उन्हापासून संरक्षण करत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.

Leave a Comment