उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले; एका बिनडोक माणसाला महाराष्ट्र सहन करतोय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जेष्ठ नेते आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका केली आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसासोबत तुमचे व्यक्तिगत संबंध कसेही असतील पण महाराष्ट्र राज्याचे ते कार्यकारी प्रमुख आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणे यांनी “बिनडोक” हे खास संबोधन देखील वापरले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवर जात राणे यांनी एक ट्विट केलं आहे.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे

नेहमीप्रमाणे उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले. या माणसाची लायकी ग्रामपंचायतीमध्ये बोलण्या इतकी पण नाही पण दुर्देव म्हणावं महाराष्ट्राचे की महाराष्ट्राच्या जनतेला अशा बिन्डोक व्यक्तीला सहन करावं लागत आहे.

आता यावरून महाराष्ट्र नेमका कोणत्या दिशेने हा प्रश्न उपस्थित होतो आहे. सध्यातरी कुणा सेना किंवा महाविकासं आघाडीतील कुण्या नेत्याने राणे यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.पण येणारी प्रतिक्रिया देखील तेवढ्याच खालच्या पातळीची असेल का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like