नवी दिल्ली । आज 2022-23 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील विशेषतः कोरोनाच्या काळात केलेल्या अनेक घोषणांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की,”आपल्या समोर ओमिक्रॉन लाटेचे आव्हान आहे. देशातील लसीकरणाच्या गतीने याला सामोरे जाण्यास खूप मदत झाली आहे. आत्मनिर्भर आरोग्य योजनेची भेट देत अर्थमंत्र्यांनी हेल्थ बजटमध्ये 135 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. ते 94 हजारांवरून 2.38 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. यासोबतच केंद्र सरकार पुढील 6 वर्षात हेल्थ सेक्टरमध्ये सुमारे 61 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
आता प्राथमिक स्तरापासून उच्च स्तरापर्यंत आरोग्य सेवांवर सरकारचे लक्ष असेल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. विशेषत: नवीन आजारांबाबत विशेष काळजी घेतली जाईल आणि त्यावर होणारा खर्च नॅशनल हेल्थ मिशनपेक्षा वेगळा असेल.
75 हजार ग्रामीण हेल्थ सेंटर्स सुरू होणार आहेत
या अर्थसंकल्पानुसार देशात आणखी 75 हजार ग्रामीण हेल्थ सेंटर्स उघडण्यात येणार आहेत. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये चाचणी केंद्रे आणि 602 जिल्ह्यांमध्ये गंभीर काळजी घेणारी रुग्णालये उघडली जातील. यासोबतच पोषणावर देखील भर देण्यात येणार असून जल जीवन मिशन (अर्बन) देखील लाँच करण्यात येणार आहे. 500 अमृत शहरांमध्ये स्वच्छता करण्यावर भर दिला जाणार आहे. स्वच्छतेसाठी सुमारे 2 लाख 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरी स्वच्छ भारत मिशन 2.0 वर पुढील 5 वर्षांत एक लाख 41 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. यासोबतच 2 हजार कोटी रुपये फक्त स्वच्छ हवेसाठी केले जाणार आहेत.
गेल्या अर्थसंकल्पात काय होते ?
विशेष म्हणजे, 2021-22 च्या शेवटच्या अर्थसंकल्पात कोविड-19 लसीसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गेल्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरसाठी प्रतिबंध, उपचार आणि काळजी या तीन गोष्टींवर भर देण्यात आला होता. 2022-23 च्या अर्थसंकल्पातही याची दखल घेण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात कोणता विशेष आरोग्य कार्यक्रम
या अर्थसंकल्पात कोरोनापासून मानसिक आजारांसाठी नॅशनल टेलीमेंटल हेल्थ प्रोग्रॅम लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. टेलीमेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आजारांच्या बाबतीत आरोग्य सेवांसाठी टेलिकॉम किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टेक्नॉलॉजीचा वापर. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मानसिक रुग्णांसाठी टेलीमेंटल हेल्थ खूप प्रभावी आहे. कोविड महामारीमुळे त्याची गरज आणखी वाढली आहे.
मेंटल हेल्थ प्रोग्रॅम सुरु होतील
त्याचबरोबर नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले प्लॅटफॉर्म लाँच केले जाईल. यामध्ये, आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांची डिजिटल रजिस्ट्रेशन, आरोग्याची विशिष्ट ओळख, संमती फ्रेमवर्क आणि आरोग्य सुविधांमध्ये सहज प्रवेश सुनिश्चित केला जाईल. यासोबतच नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रॅमही सुरू करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवा मिळण्यासाठी ‘नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रॅम’ सुरू केला जाईल.
या बजटमध्ये ईशान्य भारतातील गुवाहाटी येथे 129 कोटी रुपये खर्चून बालरोग आणि कर्करोग रुग्णालय उभारले जाणार आहे. 2022-23 च्या आरोग्य बजटमध्ये 86 हजार 606 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2021-22 या वर्षासाठी 85 कोटी 915 रुपये वाटप करण्यात आले.