आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र आरोग्य विभागानं स्थगित केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची नवी तारीख जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाची ही परीक्षा 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल तसेच याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊन विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जाणार आहे.

जर रेल्वेची परीक्षा पुढे ढकलता आली, तर 15-16 तारखेला आरोग्य विभागाची परीक्षा होईल. जर रेल्वेची परीक्षा पुढं ढकलणं शक्य झालं नाही, तर मात्र 22-23 तारखेला परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली.