घरात सारखे आजारपण सुरु आहे ? या गोष्टींकडे द्या लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । आरोग्य चांगले असेंन तर आपण कोणत्याही पातळीवर लढू शकतो . आर्थिक , मानसिक संकटांचा सामना करू शकतो . पण जर आरोग्य चांगले नसेन तर आयुष्याची गणितं फिसकटू शकतात . घरात जर आजारपण सुरु असें तर हे काही उपाय आहेत ज्यामुळे काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल .

१. घरातील बाथरूम आणि टॉयलेट्स नेहमी स्वच्छ ठेवावेत . शरीरावरील आणि शरीराच्या आतील मैल्याची स्वच्छता जिथे रोज होते , तो घरातील सर्वात अस्वच्छ भाग नेहमी स्वच्छ ठेवावा .

२ .रात्री स्वयंपाकाच्या ओट्यावर खरकटे भांडे ठेऊ नका . खरकटे बाजूला करून भांडे एका जागी जमा करावेत . पावसाळ्यात चिलटे आणि माश्या ओट्या जवळ अर्थात जिथे अन्न पदार्थ शिजवले जातात तिथे अधिक घोंगावतात . त्यामुळे खरकटे राहणार नाही याची काळजी घ्या . स्वयंपाक सुरु करण्यापूर्वी चिलटे किंवा माश्या असतील तर आधी कापूर जाळा .

३. बाहेरून आल्यानंतर चपला उचलून रॅक मध्ये ठेवाच . चपला घरात आणू नका .

४. रोज एक दिवसाड फरशी फिनेल किंवा खडीमिठ पाण्याने पुसावी . पाण्यात सुवासिक अत्तर टाकले तरीही उत्तम . मोहक वासाने मन प्रसन्न राहते . तसेच दर पंधरा दिवसांनी घरातील पायपुसणे बदला . स्वच्छ धुतलेले कोरडे पायपुसणे टाका.

५. घरात कचरा साठवून ठेऊ नका .

६.एकदा शिजवलेले अन्न सारखे गरम करून खाऊ नका . घरातील माणसांच्या अंदाजाने अन्न शिजवावे . १ पेक्षा जास्त वेळा गरम करून खाऊ नये .

७. पिण्याचे पाणी तोटी (नळ) असलेल्या भांड्यात साठवावे . हे भांडे पितळ , तांबे किंव्हा मातीचे असावे . प्लास्टिक मध्ये पिण्याचे पाणी साठवू नये .

८. रोज सकाळी आणि संध्याकाळी चांगल्या तुपाचा दिवा देवापुढे लावून कापूर जाऊन घरात फिरवा . मनाची सात्त्विकता निरोगी शरीरासाठी तेवढीच महत्वाची आहे .

Leave a Comment