Health Insurance: महागाईचा फटका, हेल्थ इन्शुरन्स 15-20 टक्क्यांनी महागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Health Insurance : सध्याच्या काळात महागाई चांगलीच वाढली आहे. या महागाईची झळ आता आरोग्य क्षेत्रालाही बसणार आहे. तसेच कोविड-19 संबंधित क्लेमही वाढले आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षात हेल्थ इन्शुरन्स महागणार आहे. यापूर्वीच अनेक कंपन्यांनी दर वाढवले आहेत, तर आगामी काळातही अनेक कंपन्या रिटेल इन्शुरन्सचे दर वाढण्याचा विचार करत आहेत. वास्तविक, कोविड-19 दरम्यान, इन्शुरन्स कंपन्यांवर क्लेमचा भर जास्त पडला आहे.

हा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी अनेक इन्शुरन्स कंपन्या आपल्या रिटेल हेल्थ प्रॉडक्ट्सच्या (Health Insurance) किंमती 15-20 टक्क्यांनी वाढवण्याचा विचार करत आहेत. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स आणि मणिपाल सिग्ना प्रोहेल्थने आपल्या इन्शुरन्स प्रॉडक्ट्सच्या किंमती अनुक्रमे 14 आणि 15 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

योग्य इन्शुरन्स कंपनी कशी निवडावी ?

तरुण वयोगटातील लोकांकडे तुलनेने जास्त पर्याय आहेत. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना करून सर्वात कमी प्रीमियम असलेला इन्शुरन्स घेता येईल. याचा मिळणाऱ्या फायद्यांमध्ये काहीच फरक पडत नाही. जे लोकप्रिय आहेत आणि ज्याचा प्रीमियम 60-70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेला नाही अशा इन्शुरन्स शोधा. Health Insurance

कंपन्या काय म्हणाल्या ?

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद रॉय यांनी सांगितले की,”सध्या फक्त प्रमुख प्रॉडक्ट्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.” इतर प्रॉडक्ट्सबाबत विचार केला जात असून गरज भासल्यास त्यांच्या किंमतीतही वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्सचे (Health Insurance) व्यवस्थापकीय संचालक प्रसून सिकदार यांच्या मते, कोरोना महामारीमुळे उपचार प्रोटोकॉलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे क्लेम महागले आहेत. हे पाहता कंपनीने तीन वर्षांत पहिल्यांदाच इन्शुरन्सच्या किंमती वाढवल्या आहेत.

हे पण वाचा :

Life Insurance: ‘या’ तीन पद्धतीने समजून घ्या की, आपल्याला किती रुपयांचा विमा पाहिजे

World Health Day : सध्याच्या काळात हेल्थ इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे? सविस्तरपणे जाणून घ्या

Leave a Comment