सांगली | गोवर व रूबेला लसीकरण मोहीमेअंतर्गत या रोगांच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदने कार्यशाळेचे आयोजन केले असून या रोगांवर नियंत्रण व त्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सांगली जिल्ह्यात १४ नोव्हेंबर पासून लसीकरण मोहिमेला सुरवात होणार आहे. ३ दिवसीय चर्चासत्रामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
गोवर व रूबेला हे अत्यंत घातक आणि विषाणूजन्य आजार आहेत. या आजारामुळे दरवर्षी भारतात हजारो मुले मृत्युमुखी पडतात. त्यामुळे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करूण लसिकरणाच्या माध्यमातून होणारे दुष्परिणाम टाळता नक्की येऊ शकतील.
यावेळी जिल्हाधिकारी वि.ना.काळम, महापौर संगीता खोत, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. भूपाल गिरी गोसावी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आदी उपस्थित होते.
● सदर कार्यक्रमासंदर्भातील ट्विटर लिंक ●
District level workshop for #MeaslesRubella Vaccination drive@MoHFW_INDIA @whoindia @WHO @diosang01 @AyushmanNHA pic.twitter.com/cZQkBG5sQY
— Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली (@ZPSangli) August 29, 2018