महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन होणार का ?? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगावर आलेलं कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसून कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं,” राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment