महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कोरोना लसीचे कमी डोस मिळाले ; राजेश टोपेंनी व्यक्त केली खंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत.दरम्यान, महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आल्याची खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

राजेश टोपे पुढे म्हणाले, ‘मला समाधान आहे कि आपण आता पर्यंत सुमारे ८ लाख लोकांचा देता लसीकरणासाठी अपलोड केला आहे. मात्र, त्याच्या तुलनेत लस थोडी कमी आली आहे. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल.

तसेच यासोबत केंद्राकडून करण्यात आलेल्या सुचनेनंतर लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आपल्याला केंद्र सरकारने एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. बफर स्टॉकसहित बोलायचं गेल्यास आपल्याला १७ ते साडे सतरा लाख डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत.

केंद्र सरकाराच्या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण डोस द्या. त्यामुळे अपेक्षेच्या तुलनेच ५५ टक्के डोस आलेल आहेत. त्यामुळे आठ लाख लोकांचं लसीकरण करायचं असतानाही आम्हाला ५५ टक्के म्हणजेच साधारण पाच लाखांपर्यंत लसीकरण पूर्ण करणार आहोत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like