महाराष्ट्रातील ओमीक्रॉनच्या सावटाबाबत आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओमिक्रोनच्या रुग्ण वाढीमुळे केंद्र सरकारकडून परदेशातून येणाऱ्यांसाठी नियम अधिक कडक केले जात आहेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकमध्ये आढलेल्या 2 ओमीक्रोनच्या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “ओमिक्रोनबाबत आरोग्य विभागाचे बारीक लक्ष आहे. हाय रिस्क देशातून आलेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील 28 जणांच्या स्वॅबचे नमुने जिनोमिक सिक्वेन्ससाठी पाठवण्यात आले असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

डॉ. राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “परदेशातून भारतात आल्यानंतरही प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करुन सक्तीचे विलगीकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. या दरम्यान आता कर्नाटकामध्ये आढळल्या दोन ओमायक्रोन रुग्णांमुळे राज्यात सतर्क राहणे आवश्यक आहे. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. आणि सर्वांनी लस घ्यावी,” असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, हाय रिक्स असलेल्या देशातून आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. हाय रिक्स असलेल्या देशातून 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 2868 प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी 485 प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यांपैकी 9 जण पॉझिटीव्ह आहेत.

You might also like