टीम, HELLO महाराष्ट्र । आजकाल वय आणि अनारोग्य यांचा काहीच संबंध राहिला नाहीये . कोणत्याही वयामध्ये म्हणजे अगदी तिशीतल्या तरुणाला देखील हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला अशा बातम्या आपण ऐकतो . यास कारण अनेक आहेत , आजची जीवनशैली , हवामान बदल , मानसिक अस्थिरता , सर्वच क्षेत्रातील स्पर्धा यामुळे ताण – तणावात वाढ होते आणि परिणामी वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळते . अनुवंशिकता हा देखील महत्वाचा भाग आहे .
खरंतर वयाच्या अगदी ४० पर्यंत मानवी शरीर चांगल्या प्रकारे प्रतिकार क्षमता जपते . पण बदलत्या चक्रानुसार काळजी म्हणून या काही शाररिक चाचण्या आहेत ज्या तुम्ही वयाच्या ३० नंतर केल्यास सतर्क राहू शकाल . योग्य खानपान आणि व्यायामासह या तपासण्याही निरोगी आणि सावध राहण्यास तुम्हाला नक्कीच मदत करतील .
१. मेमोग्राम तपासणी
२. ग्लुकोमा स्क्रीनिंग :
३. पॅम्प स्मियर
४. पीएसऐ
५. सोनोग्राफी
६. स्ट्रेस तपासणी
७. डायबिटीस तपासणी
८. सिरम क्रियेटिनिन
९. सिटी स्कॅन
१०. हाडांची तपासणी
या चाचण्याविषयी थोडी माहिती घेऊयात
१. मेमोग्राम तपासणी :
या तपासणीच्या माध्यमातून स्तनाच्या कॅन्सर विषयी माहिती घेता येते . मेमोग्राम म्हणजे स्तनांचा एक्सरे काढला जातो . त्यामुळे स्तनामध्ये कुठे गाठ आहे का हे लक्षात येऊ शकते . वयाच्या ४० नंतर स्तनाच्या कॅन्सरचा धोका अधिक असू शकतो . त्यामुळे ४० नंतर २ वर्षाच्या अंतराने तपासणी करून घेतल्यास कॅन्सर सारख्या आजारापासून वाचले जाऊ शकते . तसेच लवकर निदान झाल्याने कॅन्सर पसरू नये म्हणून देखील प्रयन्त केले जाऊ शकतात .
२. ग्लुकोमा स्क्रीनिंग : (डोळ्यांची तपासणी)
या तपासणीमुळे डोळ्यातील मोतीबिंदू विषयी माहिती मिळू शकते. डायबिटीस असेन आणि घरात कोणाला मोतीबिंदू असेंन किंवा होऊन गेला असेन तर वयाच्या २५ पासून डोळ्याची नियमित तपासणी करून घेणे उपयोगी होऊ शकते
३. पॅम्प स्मियर (गर्भाशय तपासणी)
सध्याच्या जीवनशैलीचा विचार करता प्रत्येक विवाहित महिलेने २ वर्षातून एकदा करायला हवी हि पॅम्प स्मियर तपासणी . भारतामध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे . हि तपासणी खर्चिक नसून व्हजायना मध्ये यंत्राच्या साहाय्याने हि तपासणी केली जाते . तसेच हि तपासणी विश्वासार्ह आहे .
४. पीएसऐ (प्रोस्टेट स्पेसिफिक अँजेटीं) तपासणी
या तपासणीच्या मदतीने प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सर विषयी माहिती मिळू शकते. वयाच्या ५० नंतर आणि सूज असल्यास ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे .
५. सोनोग्राफी
पोटाच्या सोनोग्राफीमुळे वेळेत अनेक आजारांविषयी माहिती मिळू शकते . त्यामुळे ४० नंतर पोटाची सोनोग्राफी महिला आणि पुरुषांनी अवश्य करून घ्यावी
६. स्ट्रेस तपासणी
या तपासणीच्या माध्यमातून हृदयाच्या नसा कशा पद्धतीने काम करत आहेत याविषयी माहिती मिळू शकते . या तपासणीसाठी ट्रेंड मिल वर चालवले जाते .हृदयावर ताण आल्यानंतर हृदयाच्या नसा कशा पद्धतीने काम करतात याची तपासणी यातून केली जाते . सध्या वयाच्या ३० मध्येदेखील हृदयरोगाने मृत्यू ओढवला जातो . त्यामुळे महिला आणि पुरुषांनी वयाच्या ३० नंतर दरवर्षी हि तपासणी करून घेणे आवश्यक आहे .
७. डायबिटीस तपासणी
डायबिटीस रुग्णाची संख्या जगभरात सर्वात जास्त भारतामध्ये आहे . सारखी तहान लागणे , सारखी भूक लागणे , चक्कर येणे , दृष्टी कमी होणे अशा समस्या वयाच्या ३० नंतर जाणवल्यास डायबिटीस तपासणी करून घ्यावी . तसेच अनुवंशिकता असल्यास हि तपासणी अवश्य करावी .
८. सिरम क्रियेटिनिन
या तपासणीच्या माध्यमातून किडनीची क्षमता तपासली जाते . ज्यांना किडनी आजाराची फॅमिली हिस्ट्री आहे , त्यांनी हि तपासणी वयाच्या ३५ नंतर अवश्य करावी . तसेच डायबिटीस , हृदयरोग असणाऱ्यांनी देखील हि तपासणी वेळेत करणे आवश्यक आहे . तुम्ही जर पेन किलर गोळ्यांचा वापर नेहमी करत असाल तर देखील हि तपासणी वेळेत करावी
९. सिटी स्कॅन (मेंदूची तपासणी)
मेंदू हा मानवी शरीराचा सर्वात महत्वाचा आणि नाजूक अवयव आहे . जो सर्वात कठोर हाडाच्या (कवटी) सुरक्षा कवच मध्ये आहे . मेंदू संपूर्ण शरीराची प्रक्रिया चालवतो . भारतामध्ये हृदय बंद पडल्यानंतर मानवी मृत्यू घोषित केला जातो . परंतु काही देशांमध्ये मज्जारज्जूचे कामकाज बंद झाले कि मृत्यू घोषित केला जातो . त्यामुळे मेंदूची वेळोवेळी तपासणी अत्यावश्यक आहे . मेंदूतील १ गाठ शरीराच्या अनेक अवयवांना बाधा पोहोचउ शकते .
१०. हाडांची तपासणी
वयाच्या ४० नंतर विशेष करून महिलांनी हाडांच्या सुदृढतेची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे . डिलिव्हरी आणि मासिक धर्म बंद झाल्यानंतर हि तपासणी अवश्य करावी . ४० नंतर हाडांमधील ड जीवनसत्व कमी होते . त्यामुळे अस्थिरोग तज्ज्ञांचा वेळेत सल्ला घ्यावा .