Health Tips : आपल्यापैकी अनेकांना दाताच्या समस्या असतील. दात पिवळे दिसणे, दातांमध्ये कॅव्हिटी होणे, दुर्गंधी होणे अशा सर्व गोष्टींमुळे चारचोघांच्यात जाणे अगदी नकोसे वाटते. शिवाय डेंटिस्ट कडे जायचे म्हंटल्यावर खर्चही खूप येतो. मात्र तुम्हाला जरा या समस्या कायमच्या नाहीशा करायच्या असतील तर ही तीन झाडं तुमच्या अंगणात लावा. आता तुम्ही म्हणाल हे काय भलतंच ? पण हो जेव्हा ब्रश पेस्ट नव्हते तेव्हा सर्रास काही ठरविक झाडांच्या छोट्याशा काठीचा वापर दात साफ करण्यासाठी केला जायचा. चला तर मग जाणून घेऊया ही झाडं नेमकी (Health Tips) कोणती आहेत ? आणि त्याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो ?
तुळस
भारतीय संस्कृतीत तुळस ही पवित्र मनाली जाते. तुळशीचा वापर आयुर्वेदिक गोष्टींसाठी करण्यात येतो. याशिवाय आपण याचा वापर दात चमकवण्यासाठी करू शकता. यासाठी आधी तुळशीची पानं वाळवून घ्या. त्याची पावडर तयार करा व या पावडर ने नियमित दात (Health Tips) घासा. तुळशीची हिरवी पाने दात मजबूत करतात शिवाय त्यातील आयुर्वेदिक घटकांमुळे हिरड्यातून होणारा रक्तस्त्राव थांबतो.
कडुनिंब
कडुनिंब हे कडू असलं तरी अत्यंत गुणकारी आहे. आजही पूर्वीप्रमाणे कडुनिंबाच्या फांद्या टूथब्रश म्हणून अनेक भारतीय लोक वापरतात. कडुलिंबात अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये तोंड व श्वासातून येणारा दुर्गंध दूर करणारे (Health Tips) गुणधर्म असतात याशिवाय त्याच्या फांद्यांनी दात घासल्याने डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीव देखील नष्ट होतात त्यामुळे नियमित कडुनिंबांना दात घासावेत.
बाभूळ (Health Tips)
ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे बाभूळ हे दातांसाठी प्रभावी (Health Tips) ठरते. ज्यामुळे दात चमकदार दिसतात आयुर्वेदात बाभळीच्या डहाळ्यांचा वापर डिस्पोजीबल टूथब्रश म्हणून करण्यात येतो. बाबुळ मध्ये आढळणारे टॅनिन दात एका झटक्यात पांढरे करतात त्यामुळे पूर्वीच्या लोकांचे दात अजूनही मजबूत आहे. जर आपल्याही दातांच्या मागे दुखणे लागू नाही असे वाटत असेल तर बाभळीच्या डहाळ्याने दात घासावेत.
दाताच्या चांगल्या आरोग्यासाठी हे करा
दात आणि ओरल हेल्थ निरोगी राखण्यासाठी दिवसातून दोनदा दात घासा. तीळ किंवा खोबरेल (Health Tips) तेलाने ऑईलं पुलिंग करा. टंग क्लीनरच्या वापराने नियमित जीभ स्वच्छ करा. खाल्ल्यानंतर नेहमी तोंड आणि दात स्वच्छ करायला विसरू नका.व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे अधिक सेवन करा. कारण व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ दातांवरील प्लेक साफ करतात.