Health Tips : हाडाच्या मजबुतींसाठी खावा हे 5 कॅल्शियमयुक्त पदार्थ

0
2
Health Tips
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Health Tips – हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम (Calcium) एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यास हाडं कमजोर होऊन विविध समस्या उद्भवू शकतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. कॅल्शियमची योग्य मात्रा शरीरात पोहोचवण्यासाठी काही विशेष अन्नपदार्थांचा समावेश आहारात करणे अत्यावश्यक ठरते. दररोज दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, बदाम, तीळ-गुळ आणि सोयाबीन ह्या पदार्थांचे सेवन हाडांसाठी फायदेशीर ठरते. पण काहींचा गैरसमज असतो कि फक्त मटण आणि अंडी खाल्यास शरीराला कॅल्शियम मिळते. तर आज आम्ही तुमचा हा गैरसमज दूर करणार आहोत . चला तर मग शरीरात कोणकोणत्या घटकाच्या सेवनामुळे कॅल्शियम मिळते याची माहिती घेऊयात.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ –

दूध हे कॅल्शियमचा (Calcium) सर्वात प्रमुख स्रोत आहे. दही, पनीर, आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये देखील कॅल्शियम भरपूर असते . हे पदार्थ हाडांना मजबुती (Health Tips) देतात आणि शरीरातील कॅल्शियमची पातळी संतुलित ठेवतात. त्यामुळे याचे सेवन करणे महत्वाचे ठरते.

हिरव्या पालेभाज्या (Health Tips)

पालक, मेथी आणि कोबी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. या भाज्या केवळ कॅल्शियमचा पुरवठा करत नाहीत, तर शरीराला आवश्यक असलेल्या इतर पोषक घटकांचं प्रमाणही वाढवतात. या सर्व हिरव्या भाज्या खाल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.

बदाम आणि सुकामेवा-

बदाम हाडांच्या आरोग्यासाठी एक उत्कृष्ट कॅल्शियम स्रोत आहे. सुकामेव्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हाडं दीर्घकाळ निरोगी ठेवतात.

तीळ आणि गुळ-

तिळ आणि गुळ ह्या हाडांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. तिळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतो, जो हाडांना मजबुती देतो. गुळामुळे रक्तशुद्धी होते आणि शरीरातील पोषणतत्त्वांची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.

सोयाबीन –

सोयाबीन हाडांच्या घनतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यात असलेले आयसोफ्लेव्होन्स हाडांना मजबुती देतात आणि सांध्यांच्या त्रासाला कमी करतात. म्हणून हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमयुक्त (Calcium)आहार घेणं अत्यावश्यक आहे. दूध, हिरव्या पालेभाज्या, बदाम, तीळ-गुळ, आणि सोयाबीन ह्या पदार्थांचा समावेश करून हाडांच्या आरोग्याची (Health Tips) योग्य काळजी घेता येते.

हे पण वाचा : गावरान आंब्याला हवामानाचा फटका ; शेतकरी चिंतेत