औरंगाबाद : वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कार्यालयात कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नियमबाह्य त्रास देण्यात येत आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात वारंवार तक्रार करूनही प्रशासनाच्या वतीने कुठलीच कारवाई होत नाही. म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद व प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवाडी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
गेल्या अनेक दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद व प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवाडी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विविध कामातून त्रास देण्यात येत असल्याचे संघटनेच्या एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली परंतु उलट या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाहेरील गुंड आणि भावाकडून कर्मचाऱ्यांना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या देण्यात येत असल्याचे या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.