तारीख पे तारीख! मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आज सुनावणी पार पडणार होती. परंतु आता ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयासमोर ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न घेता प्रत्यक्षरित्या घेण्याची विनंती केली. दरम्यान, दोन आठवड्यांनी म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी न्यायालय आता यावर निर्णय देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी २५ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे करण्यात येणार होती.

“मुंबईत असलेल्या लोकांसोबत यासंदर्भात व्हर्च्युअल पद्धतीनं संवाद साधणं आम्हाला कठिण होत आहे. त्यामुळे यासदर्भातील सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न करता प्रत्यक्षरित्या घेतली जावी,” अशी विनंती राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाकडे केली. “२५ जानेवारीपासून या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही सुनावणी प्रत्यक्षरित्या सुनावणी करता येईल का नाही किंवा कोणत्या तारखेपासून करता येईल याबद्दल दोन आठवड्यांनी निर्णय घेण्यात येईल,” असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला होता. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला होता. मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी विविध उदाहरणे देऊन स्थगिती हटविण्याची विनंती केली होती. मात्र, त्याला न्यायालयानं स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि पुढील सुनावणीसाठी २५ जानेवारी ही तारीख निश्चित केली होती.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment