हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत तणावपूर्ण वातावरणात शाहीन बागेत सीएए विरोधात निदर्शने सुरू आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलकांना हटविण्याबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती. सध्या वातावरण चांगले नाही, असे सांगून कोर्टाने सुनावणीला मार्चपर्यन्त स्थगिती दिली. तसेच सर्व पक्षांनी आपला पारा खाली आणावा असा सल्ला कोर्टानं राजकीय पक्षांना दिला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या निर्णयाचा विरोध करत आपली बाजू मांडताना म्हटलं की, ”आम्ही पोलिसांना निराश करू शकत नाही. आमचा एक पोलीस जवान मरण पावला आहे आणि एक डीसीपी गंभीर जखमी झाले आहेत. यावर प्रती उत्तर देत न्यायमूर्ती कौल म्हणाले की,” तुम्ही इंग्लंड पोलिसांकडे पाहा, तेथिल पोलीस प्रशासन कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा करत नाही. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन कृती करते.”
तुषार मेहता पुढे म्हणाले की, ”आमचा डीसीपी व्हेंटिलेटरवर आहे, त्यांचे हेल्मेट काढून त्याच्यावर हल्ला केला. ही तेव्हा तुम्ही यावर निर्णय द्याल हवा.” यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, ”याच हिंसाचारात १३ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ही एक गंभीर बाब आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणे विरोध प्रदर्शनांची जागा नाहीत ” असंही आजच्या सुनावणीत म्हटलं आहे.
न्यायमूर्ती के.एम. जोसेफ म्हणाले, “ज्यावेळी एखादी चिथावणीखोर टिप्पणी केली गेली होती त्याचवेळी पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती. ही बाब केवळ फक्त दिल्लीच नव्हे तर देशातील इतर राज्यांना सुद्धा लागू होते. पोलिसांनी कायद्यानुसार काम करायला हवं. ही समस्या पोलिसांमध्ये असलेल्या प्रोफेशनलजिम या उणीवेमुळं आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.