Heart Attack | हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून तारुण्यातच घ्या अशी काळजी; या पदार्थांचे करा सेवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Heart Attack | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. अगदी तरुण वयातील मुलांनाही अनेक वेगवेगळे आजार होताना दिसत आहे. यातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. चुकीची जीवनशैली तसेच पोषक आहारात कमतरता, ताण तणाव या सगळ्या गोष्टीमुळे तरुण वयातही हृदय विकाराचा झटका येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे लम अनेक लोक वयाच्या वीस आणि तिशीत आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आणि नको त्या जीवनशैलीचा अवलंब करतात. परंतु पुढे जाऊन याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.

अनेक लोक हे घरातील जेवण जेवण्यापेक्षा बाहेरील तेलकट पदार्थ, फास्ट फूडचा आनंद घेतात. यामुळे तरुण वयातच त्यांना अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या जेवणाकडे विशेष लक्ष दिले, तर अनेक आजारांपासून सुटका होईल.

रिफाइंड धान्यपेक्षा संपूर्ण धान्याचा वापर करा | Heart Attack

तांदूळ, मैदा यांसारखे पदार्थ हे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. आणि धोकादायक कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढवतात. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. या सगळ्यामुळे रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. आणि हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता वाढते. या ऐवजी तुम्ही लाल तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि ओट्स यांसारखे संपूर्ण धान्य असलेले पदार्थ खाऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासाठी हे पदार्थ फायदेशीर ठरतात.

निरोगी फॅट्स खाणे

मोहरीचे तेल ऑलिव्ह ऑइल तसेच शेंगदाण्याच्या तेलामध्ये देखील मोनो अनसॅच्युलेटेड फॅक्ट्स असतात. ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते. तसेच खोबरेल तेल आणि तूप यामध्ये जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स असतात. यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

भरपूर फळे आणि भाज्या खा | Heart Attack

दैनंदिन जीवनात आपण भाज्या तसेच फळे खाणे गरजेचे आहेम पेरू, पपई, फळे, पालक, टोमॅटो यांसारख्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक पोषणतत्वे मिळतात. आणि हृदयाचे आरोग्य देखील चांगले होते. त्यामुळे रोज आहारात या गोष्टींचा समावेश करा.

आहारात मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा

तुम्ही जर आहारात जास्त मिठाचे सेवन करत असाल, तर तुमचा रक्तदाब वाढतो. तसेच साखरेच्या सेवनाने लठ्ठपणा तसेच मधुमेहाचा धोका वाढतो. या दोन्ही गोष्टी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने जर रोज 5 ग्रॅम पेक्षा कमी मीठ खावे. तसेच दैनंदिन जीवनात 90 ग्राम पेक्षा देखील कमी साखर खावी. यामुळे वजन नियंत्रणात राहते.