Heart Attack Symptoms for Men and Women | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत चालली आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. बदलती जीवनशैली, बदलता आहार, बदलते राहणीमान अयोग्य वेळा यामुळे त्यांच्या हृदयावर ताण वाढला आहे. आणि आजकाल हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक या आजारांमुळे दरवर्षी जवळपास लाखो लोकांचा मृत्यू होतो.
कोरोना महामारी आल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. अनेकजण असं म्हणतात की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना लवकर हृदयविकाराचा झटका येतो. तर काहींचे असे म्हणणे आहे की, पुरुषांना लवकर हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की कोणाला हृदयविकाराचा झटका लवकर येतो.
पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक | Heart Attack Symptoms for Men and Women
हाती आलेल्या एका अहवालानुसार महिलांपेक्षा पुरुषांना कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता मोठी आहे. आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार लिंगानुसार हृदयाच्या समस्यांचा धोका अनेक घटकांवर अवलंबून असतो. अभ्यासातून असे समोर आलेले आहे की, महिलांच्या तुलने पुरुषांना लवकर हृदयविकाराचा झटका येतो. पुरुषांमध्ये धूम्रपान तसेच मद्यपान त्यांसारख्या सवयीमुळे हा धोका वाढला जातो, असे म्हणले जाते. तसेच महिलांमध्ये सेवानिवृत्तीनंतर हा हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
पुरुष आणि स्त्रियांमध्ये हृदयविकार झटका येण्याची कारणे वेगळी
महिला आणि पुरुष या दोघांच्याही जीवनशैली आणि आहाराच्या सवयी वेगळ्या असतात. त्यामुळे हृदयविकाराच्या जोखीमेचे घटक समजून घेणे त्याला प्रतिबंध करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असू शकतात. महिलांना मळमळ, चक्कर येणे, थकवा यांसारखी लक्षण दिसू शकतात तर दुसरीकडे पुरुषांना छातीत दुखणे, गरम होणे, जबडा दुखणे यांसारख्या समस्या येतात.
स्त्रियांचे हृदय पुरुषांपेक्षा लहान असते
संशोधनातून असे समोर आले आहे की, महिलांच्या हृदयाचा आकार या पुरुषांच्या हृदयाच्या आकारापेक्षा लहान असतो. त्यांच्या धमन्या विस्तारलेल्या असतात. हृदयाला चार भागात वेगवेगळ्या पातळ अशा भिंती असतात. या कारणांमुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांना हृदयविकाराचा धोका असतो. तरीदेखील पुरुषांमध्ये हे हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण सध्या जास्त आहे.