हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपलं शरीर निरोगी आणि धष्टपुष्ट राहावे म्हणून आपण जिम लावतो. देशातील अनेक तरुण- तरुणी सकाळ संध्याकाळ जिमला जातात, आणि त्यांच्या शरीरावर मेहनत घेत असतात. जिम करण्यात वाईट किंवा चुकीचे असं काहीच नाही. परंतु मागील काही दिवसात जिम करताना हृदय विकाराचा झटका आल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. त्यामुळं मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे. यामागील नेमकं कारण काय आहे? अशा गोष्टी टाळण्यासाठी काय करावे? कोणत्या गोष्टी टाळाव्या? याबाबत आज आम्ही सविस्तर सांगणार आहोत.
जिममध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे:
१) अतिरेक करणे- काहीजण जिम मध्ये व्यायाम करत असताना अतिरेक करतात, एखादे वजन उचलत नसतानाही ते जोरजोराने उचलण्याचा प्रयत्न करतात. लवकरात लवकर बॉडी व्हावी यासाठी हे स्वतःला जोरात पुश करतात असता यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो.
२) उच्च रक्तदाब: व्यायाम केल्याने रक्तदाब तात्पुरता वाढतो. काहींसाठी तो लवकर सामान्य होऊ शकत नाही, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
३) लवकर निदान होत नाही – बरेच तरुण आणि प्रौढ लोक त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करत नाहीत. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वेळ वर्क आऊट करता अशावेळी हृदयाची स्थिती किंवा ब्लॉकेजमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
४) व्यसन – सध्या व्यसनाचे प्रमाण सर्वत्र वाढलेलं आहे. तुम्ही जर धुम्रपान करत असाल, दारू पीत असाल आणि जिम ला जास्त असाल तर यामुळे सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जीममध्ये हृदयविकार येण्याची लक्षणे कोणती?
व्यायामादरम्यान किंवा नंतर छातीत दुखणे
मळमळणे
श्वास घेण्यात अडचण
चक्कर येणे
अचानकपणे जास्त घाम येणे
हृदयविकार टाळण्यासाठी काय करावं
तुमची क्षमता आहे तेवढच वजन उचला, त्यांनी शरीराला जेवढं झेपेल तेवढाच व्यायाम करा.
शरीराची नियमित तपासणी करत आरोग्याविषयी अपडेट्स जाणून घ्या.
व्यायाम करत असताना जर शरीराला वेदना जाणवू लागल्या तर त्याकडे दुर्लक्ष्य करू नका. लगेच व्यायाम थांबवा.
नियमित पाणी प्या, पुरेशी झोप घ्या
योग्य प्रमाणात आहार घ्या
जिममुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो?
खरं तर जिम हे निरोगी आयुष्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम गोष्ट आहे. परंतु सर्वानाच ती झेपेल कि नाही याबाबत कणी सांगू शकत नाही. ज्यांना ओढून ताणून जिम कारवी लागते अशा लोकांना जिम धोकादायक आहे. त्यामुळे व्यायाम करत असताना आपल्या शरीराची सुरक्षितता महत्वाची आहे.
जिम करत असतानाच अचानकपणे तुम्हाला छातीत दुखणे, मळमळ, श्वास लागणे, चक्कर येणे, घाम येणे यांसारखा त्रास जाणवला तर ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.