हृदयद्रावक..! कोरोनामुळे तब्बल 13 बालकांनी गमावले आई-वडिलांचे छत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या नवजात बालकांना पासून 18 वयोगटापर्यंतच्या मुलांचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. यात आतापर्यंत 233 मुलांचा शोध घेण्यात यश आला. त्यातील 13 मुलांचे आई-वडील अशा दोघांनाही कोरोनाने हिरावून घेतले, तर उर्वरित 220 मुलांपैकी कोणाचे वडील तर कोणाचे आई कोरोनाचे बळी ठरले आहेत.

राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने कोरोना महामारी मध्ये आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांचा शोध घेण्याचे आदेश प्रत्येक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रमुख वर्षा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती नियुक्त करण्यात आली आहे. यात 0 ते 18 वयोगटातील मुलांचा समावेश असून त्या सर्वांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात शोध मोहीम सुरू असून यात आत्तापर्यंत 233 बालकांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले आहे.

दरम्यान, आतापर्यंत ज्या मुलांपर्यंत प्रशासन पोहोचू शकले आहेत त्यामध्ये तेरा बालकांचे आई-वडील अशा दोघांनाही कोरोनाने हिरावून घेतले आहे. उर्वरित 220 मुलांपैकी काहींचे मातृ तर काहींचे पितृछत्र हरपले आहे. अजूनही जिल्ह्यात मुलांचा शोध सुरुच आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील बालकांचा समावेश आहे. त्या सर्व बालकांची यादी सध्या अद्यावत करून त्यांना प्रशासनाच्या सूचनेनुसार योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नियुक्त केलेल्या कृती दलाच्या वतीने केली जात आहे.

ग्रामीण भागातील अधिक बालके :

जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या या सर्वेक्षणात 233 बालकांचा शोध लागला आहे. ही प्राथमिक आकडेवारी असून अजूनही शोध सुरूच आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात सर्वाधिक बालकांनी कोरोनामुळे आई -वडीलांपैकी एकाला गमावले आहे. त्यापैकी ज्यांना बालगृहाची आवश्यकता आहे त्यांना बालगृहामध्ये ठेवले जाणार आहे. तसेच एक पालक असलेल्या मुलांना शिक्षणासह इतर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे

Leave a Comment