प्रेमाच्या छायेत दडलेलं अंधाराचं कटू सत्य… शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित !!

sajna movie
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

‘सजना’ हा एक खास आगळावेगळा मराठी चित्रपट २७ जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सूड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे ‘सजना’ चित्रपट, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे.

या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील मनोरंजनशी संबंधित विविध चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात आले.या ट्रेलरच्या माध्यमातून सजना चित्रपटाची एक खास झलक समोर येते. सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट यात पाहायला मिळणार आहे. नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येणारे संघर्ष, मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सूड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे.

YouTube video player

प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे. जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सारं काही संपलं आहे, तेव्हाच ही कथा एक अनपेक्षित वळण घेते जी प्रेक्षकांचे मन सुन्न केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे. ‘सजना’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत धोत्रे यांनी केली असून कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनही धोत्रे यांचेच आहे. छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे. संगीत ओंकारस्वरूप यांचं असून सिनेमातील रोमान्टिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनली आहेत.