Heatwave Alert | राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, अशी घ्या आरोग्याची काळजी

0
1
Heatwave Alert
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Heatwave Alert  यावर्षी उन्हाळा जास्त प्रमाणात जाणवत आहे. भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये यावर्षी उष्णतेच्या लाटेचा (Heatwave Alert ) इशारा जाहीर केलेला आहे. तेलंगणा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे. भारतीय हवामान विभागानुसार महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेचा प्रभाव देखील वाढू शकतो. त्यामुळे आपल्याला आरोग्याबाबत अनेक आव्हाने उभी राहू शकतात.

आपण जर जास्त कडक सूर्यप्रकाशात किंवा उष्ण वाऱ्यामध्ये जास्त संपर्क आला, तर आपल्या त्वचेची स्थिती खराब होते. परंतु यांसारख्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत तुमची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्हाला जास्त काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत.

उष्णतेची लाट म्हणजे काय ? | Heatwave Alert 

उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना लू असेही म्हणतात. एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट निर्माण होत असते. त्यामुळे तापमान जास्त वाढते आणि लोकांना अधिक उष्णता जाणवते. त्यामुळे समस्या देखील वाढू शकते. आणि तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

उष्माघाताचा आरोग्यावर होणारा | Heatwave Alert 

दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नका

उष्माघातापासून टाळण्यासाठी शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर जाऊ नका. उन्हाच्या वेळी दिवसभर थंड ठिकाणी राहा. त्याचप्रमाणे गरजेनुसार एसी, पंखा, कुलर वापरा. बाहेर जायचे असल्यास सकाळी 9 च्या आधी आणि संध्याकाळी 5 नंतर जा.

जास्तीत जास्त पाणी पिणे

उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त घाम येतो. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. आणि आपल्याला डीहायड्रेशनचा धोका जाणवतो. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी ताक, नारळ पाणी, रस, लिंबू यांसारखे पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

सनस्क्रीन वापरा

दिवसा तुम्हाला बाहेर जायचे असेल, तर तुमच्या त्वचेला सनस्क्रीन लावून जा. त्यामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचा तुमच्या त्वचेवर प्रभाव होत नाही. त्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण होते.

सैल कपडे घाला

उन्हाळ्यात सहसा घट्ट कपडे घालणे टाळा. त्याऐवजी कॉटनचे कपडे घाला. सुती कपडे परिधान करा त्यामुळे तुम्हाला घाम जास्त येणार नाही. आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल.

आहार

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नका. कारण उन्हाळ्यात आपल्या शरीरातील उष्णतेची पातळी वाढलेली असते. त्यामुळे तुम्ही जर असे पदार्थ खाल्ले, तर जास्त प्रभाव होऊ शकतो. या ऐवजी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, पुदिना यांसारखे पदार्थांचे सेवन करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त पाणीदार फळे खा. यामध्ये टरबूज, खरबूज, संत्री, डाळिंब यांसारखी फळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहील.