शेअर बाजारामध्ये प्रचंड घसरण: सेन्सेक्स 600 तर निफ्टी 160 अंकांच्या खाली बंद, गुंतवणूकदारांचे 1.59 लाख कोटी रुपये बुडाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । युरोपमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेच्या निवडणुकीविषयी सुरू असलेल्या चिंतेमुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये घसरण झाली. हाच परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आला. बीएसईचा-30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 600 अंकांनी घसरून 39,922 वर बंद झाला. त्याचबरोबर एनएसईचा- 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक असलेला एनएसई निफ्टी 160 अंकांनी खाली आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे 1.59 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

शेअर बाजारात तीव्र घट – बँकिंग शेअर्सवर आज सर्वाधिक परिणाम दिसून आले. बँक निफ्टीमध्ये सुमारे 600 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी मध्ये अखेर 537 अंकांची घसरून होऊन 24,233 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 170 अंकांनी खाली 17,048 वर बंद झाला. सेन्सेक्सच्या 30 पैकी 25 शेअर्सची विक्री झाली. निफ्टीच्या 50 पैकी 41 कंपन्यांची घसरण झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 शेअर्स खाली आले.

शेअर बाजार का घसरला – एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन प्रमुख असिफ इक्बाल यांनी न्यूज 18 हिंदीला सांगितले की, अमेरिकेत निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. अशा परिस्थितीत राजकीय अस्थिरतेच्या गंभीर चिंतांमुळे बाजाराचा मूड खराब झाला आहे. दररोज काही ना काही सर्वे येत आहेत, तर काहींमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मागे पडलेले दिसत आहेत. ज्यामुळे बाजारपेठेतील अस्थिरता वाढत आहे.

त्यांनी सांगितले की, मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, निवडणुकीनंतर मदत पॅकेज जाहीर केले जाईल. कारण, रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅट यांच्यात या विषयावरील चर्चा योग्य दिशेने पोहोचलेली नाहीत. म्हणूनच, बाजारावरील दबाव वाढला आहे.

आता गुंतवणूकदारांनी काय करावे- आसिफ इक्बाल म्हणतात की गुंतवणूकदारांनी घाबरू नये. त्याऐवजी घसरण झालेल्या चांगल्या शेअर्सवर पैसे लावा. मात्र, पुढील एक महिना आणि शेअर बाजार अत्यंत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. कारण अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी खबरदारी घ्यावी….

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment