सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

राज्यात सध्या मान्सूनपुर्व पावसाचं हवामान तयार झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पुढील काही काळात सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील 3-4 तास घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

सध्या आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळे आता भारतीय किनारपट्टी भागात मोठा धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळामुळे आता महाराष्ट्रातील तापमान कमी झाल्याचं पहायला मिळतंय. कोकण तसेच घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू झाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या 12 जिल्ह्यात आता पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती, त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याने आता मच्छिमारांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Leave a Comment