औरंगाबादकरांची झोपमोड ! सकाळीच विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गेल्या सोमवारपासून देशात राजस्थानमधुन परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळाने 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना झोडपून काढले. या चक्रिवादळाचा प्रवास नंतर उत्तर महाराष्ट्रात व गुजरात मार्गे अरबी समुद्रात गेल्याने या गुलाब चक्रिवादळाचे नामकरण शाहीन करण्यात आले. शाहीन चक्रिवादळ सध्या सक्रिय असुन ओमान च्या आखातात केंद्रित आहे. इतिहासात प्रथमच औरंगाबाद शहराला एका महिन्यात तीन वेळेस ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले.

काल दि. 01 ऑक्टोबर रोजी दिवसभर शहरावर आकाश निरभ्र राहिल्याने आर्द्रता घटल्याने कमाल तापमानान सुमारे दोन अंशाची वाढ नोंदवली गेली. शाहीन चक्रिवादळाने निर्माण केलेली वातावरण निर्मीती, परतीचा पाऊस व औरंगाबाद शहरावरील वातावरण बदलाचा एकत्रीत परिणाम आज पहाटे शहरावर झालेल्या जोरदार पावसावर दिसुन आला. यामुळे आज दि. 02 ऑक्टोबर 2021 पहाटे 03:25 वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. यानंतर 03:38 दरम्यान मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पहाटे 03:38 ते 04:03 या पंचवीस मिनीटात विजांचा कडकडाटासह सरासरी 118 मीली मिटर प्रति तास या ढगफुटीच्या वेगाने पाऊस पडला. नंतर पावसाचा जोर कमी झाला. पहाटे 03:25 ते 05:35 या दोन तासात शहरावर 78.2 मिमी पावसाची नोंद झाली. या वर्षी प्रथमच औरंगाबाद शहरावर गेल्या एका महिन्यात तीन वेळेस ढगफुटीच्या वेगाने पावसाने हजेरी लावली आहे.

संपूर्ण नरेगाव पाण्याखाली –
सकाळीच झालेल्या अतिमुसळधार पावसाने नरेगावातील आनंद गाडे नगर येथील नाल्याला पूर आल्याने परिसर जलमय झाला असून, घरा- घरामध्ये पाणी शिरले आहे. तसेच शहरातही अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना आहेत. अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

Leave a Comment