ढगफुटी अतिवृष्टी : शिराळा तालुक्यातील एमआयडीसीत कंपन्यांचे पत्रे उडाले, सहाजण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील एमआयडीसी परिसरात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या ढग फुटीच्या पावसात अनेक कंपन्यांच्या इमारतीचे पत्र्यांचे शेड जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. या वादळी वाऱ्यांच्या पावसात सहाजण जखमी झालेल्या आहेत. नुतन महादेव डांगे (वय- 23 रा. शिराळा) युवतीचे पायवर भिंत पडल्याने दोन्ही पाय मोडले असून मेघा लक्ष्मण पाटील (वय- 23 रा. थावडे शाहूवाडी) या दोन महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत.

गेल्या तीन दिवसापासून शिराळा तालुक्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी 5 जून रोजी दुपारी 2 वाजल्यापासून दाट ढग दाटून आले होते. दुपारीचे सायंकाळ झाल्यासारखे वातावरण तयार झाले होते. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा व पावसाची तीव्रतेचे प्रमाण एवढे जास्त होते की बघता बघता बर्‍याच कंपन्यांच्या छतावरील पत्रे उडून जायला सुरवात झाली. पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे हे पत्रे उडून इतरत्र शेतात व दुसऱ्या कंपन्यांच्या शेडवरती जाऊन आदळत होते. वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या परिसरात असलेली झाडेही उन्मळून पडलेली आहेत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/517997432948759

गेल्या काही दिवसापासून कंपन्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. तर काही कंपन्या शासकीय नियमानुसार ठरवून दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्या वरती सुरू असल्याने मोठी जीवित हानी टळली आहे. उडून गेलेले पत्रे व पडलेले इमारतीचे काही भाग पाहिले असता या ढगफुटीची आणि वादळाची तीव्रता लक्षात येते. एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या दोन महिला व चार पुरुष असे सहा जण जखमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याबाबत अधिकृत माहिती समजलेली नाही. शहरातील सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर कंपन्यांचे मालक व्यवस्थापक यांनी एमआयडीसीमध्ये धाव घेत किती नुकसान झाले आहे याचा अंदाज बांधण्याचे काम सुरू केले आहे.

वादळात इकोराईज बायोफर्टी लायझर कंपनीची भित पडली व छत उडाले. यामध्ये काम करणाऱ्या तीन मुली व एक महिला जखमी झाले आहेत. या घटनेत सविता बाजीराव निकम (वय- 40), स्नेहल आनंदराव मस्के (वय- 23) या दोघींना डोक्याला मार लागला आहे.

भटवाडी येथे एक महिला जखमी तर दहा जणांच्या घरावरील पत्रे काैले उडाली

भटवाडी येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घराचा पत्रा लागल्याने अर्चना महादेव चव्हाण जखमी झाल्या आहेत. भटवाडी येथे आज झालेल्या वादळी पावसामुळे नाळा वस्ती म्हणून राहत असलेले प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दिपक विश्वास चव्हाण, सुभाष बाळू चव्हाण, हंबीर बाळू चव्हाण, शीला शंकर चव्हाण, युवराज शामराव चव्हाण, राजाराम लक्ष्मण चव्हाण, राम लक्ष्‍मण चव्‍हाण, बाबासो शंकर फडतरे या नागरिकांची घरे घरावरील पत्रे कौले वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. त्यांच्या घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे

Leave a Comment