नंदुरबार | हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणारे मराठा आरक्षणाचे आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चार आंदोलकांच्या पैकी तीन आंदोलकांना अटक करण्यात आली असून एका व्यक्तीचा पोलीस तपास करत आहेत. या चारी आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांच्या गाडीवर चढून त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. ही घटना रविवारी ५ ऑगस्ट रोजी नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडली आहे. काल या घटने बद्दल हिना गावित यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. तसेच नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी केली होती. या घटनेच्या निषेधार्थ काल नंदुरबार जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता.
Home ताज्या बातम्या खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तींवर होणार अॅट्रॉसिटी कायद्या...