हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि या काळात राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेली असतानाच पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ऐन विधानसभेच्या निवडणुकीत नंदुरबारमध्ये भाजप या पक्षाला एक मोठा धक्का बसलेला आहे. कारण भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भाजप पक्षाला राजीनामा दिलेला आहे. भाजपने हिना गावित यांना नंदुरबारमधून उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा हा उमेदवारीचा अर्ज बाद झाला. त्यानंतर हिना यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता त्यांच्या पक्षाला अपक्ष उमेदवारीचा कोणताही कोणती अडचण निर्माण होऊ नये. म्हणून त्या राजीनामा देत आहेत, असे विधान त्यांनी केलेले आहेत.
डॉक्टर हिना गावित या अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढत आहे. अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुद्धा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटात विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करीत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी मतदारसंघात अनेक विकासाची कामे देखील केलेली आहे. आणि याच विकास कामाचा फायदा त्यांना होणार आहे. त्यामुळे भरघोस मतदान मिळून त्या विजयी होणार आहेत, असा दावा त्यांनी केलेला आहे.
हिना गावित यांनी 28 तारखेला अक्कलकुवा आक्रनी या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु जागा वाटप करताना एकही जागा शिंदे गटाला सुटली नाही. हिना गावित या 2014 रोजी लोकसभेत पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. लोकसभा निवडणूक लढल्यानंतर त्या सर्वाधिक तरुण खासदार ठरल्या होत्या. ज्यावेळी हिना गावित या लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. त्यावेळी त्या केवळ 26 वर्षाच्या होत्या. हिना गावित यांनी त्यांच्या पहिल्याच कामगिरीने लोकांवर खूप चांगली छाप पडलेली आहे. आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. परंतु आता विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना त्यांनी भाजप पक्षाला राजीनामा दिल्यानंतर याचे कोणते परिणाम भोगावे लागणार आहेत? हे पाहणे महत्त्वाचे आहे.